संवत्सरात..यांच्या किर्तनाविना ऋषीपंचमी साजरी !

संवत्सरात..यांच्या किर्तनाविना ऋषीपंचमी साजरी !

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतीनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत सालाबादप्रमाणे या वर्षी ऋषीपंचमी ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांच्या कीर्तन सेवेशिवाय साजरी झाली असून या निमित्ताने महिलांनी गंगास्नानासाठी चक्रधर स्वामी मंदिरानजिक मोठी गर्दी केलेली आढळून आली आहे.

या वर्षी दारणा,गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सुमारे सोळा हजार क्युसेकने गोदावरी नदीतून पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरु आहे.स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या महिलांनी व भाविकांनी जास्त गर्दी न करता व थेट नदी पात्रात खोलवर न उतरता काठावरुनच चक्रधर स्वामी मंदिराच्या मागील बाजूस बेटावर जाऊन लाभ घेतला आहे.

संवत्सर येथील रविवार दि.२३ ऑगष्ट रोजीचा ऋषीपंचमीचा सोहळा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी नुकतीच दिली होती.त्यामुळे भाविकांना यावेळी मीराबाई मिरीकर यांच्या कीर्तनाला मुकावे लागले आहे.
संवत्सर हे गांव रामायण काळातील दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो.गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या संवत्सरमध्ये रामायण काळातील थोर महर्षि शृंगऋषींचे वास्तव्य होते.त्यांचे मोठे मंदीर या ठिकाणी आहे.या शृंगऋषींना राजा दशरथाने श्री रामाच्या जन्माच्या अगोदर पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी या ठिकाणाहून नेलेले होते. म्हणून या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व आहे.ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सर येथे प.पू.रामदासी महाराज यांच्या प्रेरणेणे स्व.नामदेवराव परजणे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून त्यादृष्टीने परंपरा चालू ठेवलेली होती.ती आजतागायत सुरु आहे.शृंगऋषींच्या मंदिराजवळील गोदावरीच्या काठावर महिला मोठ्या संख्येने स्नानाची पर्वणी साधतात.ह.भ.प.मिराबाई मिरीकर यांनी दरवर्षी संवत्सरला येवून किर्तन सेवा पार पाडण्याचे वचन दिलेले त्यानुसार श्री शनी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी किर्तनाचा कार्यक्रम होत असतो. मात्र यावर्षी मात्र कोरोना साथीमुळे त्यास फाटा देण्यात आला होता.तरीही वैजापूर,येवला,गंगापूर,शिउर, लोणी,देवळाने, अनकाई,चांदवड,मनमाड,चांदवड,राहाता,संगमनेर आदी ठिकाणाहून महिला भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

उपस्थित भाविकांनी दुपारी बारा वाजेपार्यंत स्नानाची पर्वणी साधली आहे.अनेक भाविकांनी शृंगेश्वर मंदिर,चक्रधर स्वामी मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला आहे.त्या वेळी सुरक्षित अंतराचे महिला भाविकांनी पालन केल्याचे दिसून आले आहे.

या वर्षी दारणा,गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सुमारे सोळा हजार क्युसेकने गोदावरी नदीतून पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरु आहे.स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या महिलांनी व भाविकांनी जास्त गर्दी न करता व थेट नदी पात्रात खोलवर न उतरता काठावरुनच चक्रधर स्वामी मंदिराच्या मागील बाजूस बेटावर जाऊन लाभ घेतला आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.