सुशीलामाई काळे महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

सुशीलामाई काळे महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार दि.२९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वाणिज्य शाखा, समाजशास्त्र व भाषा विषयावर हे राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात येत आहे. संशोधक आणि विद्यार्थी यांच्यातील संशोधक वृत्तीचा विचारमंच उपलब्ध होऊन त्यांच्यातील संशोधन विषयक नव्या दिशांना अभ्यासासाठी संधी मिळावी या उद्देशातून ‘रिसेंट ट्रेडस इन रिसर्च’ या विषयावर या चर्चासत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उदघाटन माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व तेलंगणा राज्यातील काकतीय विद्यापीठ वारंगळ संचलित शासकीय पदवी महाविद्यालय महबूबाबाद येथील वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉ.थीरूनाहरी युगंधर हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे. प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांसाठी हे राष्ट्रीय चर्चासत्र मोठी संधी असून या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्या डॉ.गुरसळ यांनी शेवटी केले आहे.


या चर्चासत्राचे उदघाटन माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व तेलंगणा राज्यातील काकतीय विद्यापीठ वारंगळ संचलित शासकीय पदवी महाविद्यालय महबूबाबाद येथील वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉ.थीरूनाहरी युगंधर हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे. प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांसाठी हे राष्ट्रीय चर्चासत्र मोठी संधी असून या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्या डॉ.गुरसळ यांनी शेवटी केले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.