उधारी मागीतल्याच्या कारणावरून हाणामारी

उधारी मागीतल्याच्या कारणावरून हाणामारी

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दुकानदार मोहन सोमनाथ जावळे यांनी आपल्या दुकानाची उधारी मागीतल्याच्या राग मनात धरून आरोपी विजय भाऊसाहेब जावळे,रामनाथ भागवत शिंदे,सुनील भागवत शिंदे,आदींनी आपल्याला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे सोनेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

मोहन जावळे यांचे सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत दुकान असून त्या दुकानातून उधार माल घेऊन गेलेले आरोपी विजय जावळे,रामदास शिंदे,सुनील शिंदे यांनी आपण उधारी मागीतल्याचा राग मनात धरून आपल्याला दि.२१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्याच दुकानासमोर आधी शिवीगाळ करून नंतर दमदाटी केली.व त्या नंतर लाथाबुक्यांनी तसेच दुकानासमोर पडलेल्या पाईपने मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मोहन जावळे यांचे सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत दुकान असून त्या दुकानातून उधार माल घेऊन गेलेले आरोपी विजय जावळे,रामदास शिंदे,सुनील शिंदे यांनी आपण उधारी मागीतल्याचा राग मनात धरून आपल्याला दि.२१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्याच दुकानासमोर आधी शिवीगाळ करून नंतर दमदाटी केली.व त्या नंतर लाथाबुक्यांनी तसेच दुकानासमोर पडलेल्या पाईपने आपल्या डोक्यात उजव्या बाजुस मारहाण करून सुनील शिंदे याने पाईपने मारहाण केल्याची फिर्याद मोहन जावळे यांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५११/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अनिल बाबर हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.