कुंभारीत तुकाराम बाबा विद्यालयात बालआनंद मेळावा उत्साहात साजरा

कुंभारीत तुकाराम बाबा विद्यालयात बालआनंद मेळावा उत्साहात साजरा

संपादक-नानासाहेब जवरे

कुंभारी-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयात ज्ञानदानासह विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व्हावा म्हणून बालआनंद मेळावा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.के.गवळी हे होते.

आपल्या “तपश्चर्याच्या” साधनेने महादेवाला प्रसन्न करुन भगिरथाने धरतीवर “गंगा” आणली आहे. त्याच प्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची “ज्ञानगंगा” महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत पोहचवली त्यांचे कार्याचा वारसा पुढे माजी खा. शंकरराव काळे यांनी आपल्या कार्यातून चालू ठेवला असल्याचे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक बी.के गवळी यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमास शिवाजी कदम , पोपट निळकंठ, श्रीकृष्ण पैठणे, बबन बढे, श्रीराम घुले , तसेच शाळेचे शिक्षक शिंदे ऐस.के, आमले ऐन.टी, दिवे , भोईर , बाविस्कर, वसावे, पावरा , भंडारे तसेच शिक्षिका कातकडे , साळवे, देशमुख , व कर्मचारी दोडके , बनकर , ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष रामराव साळुंके यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी लावलेले स्टॉल पाववडे, बोर , भाजीपाला, पेरू, बिस्किट, चॉकलेट, पाणीपुरी, भेळ, तसेच अन्य पदार्थांच्या स्टॉलचे उदघाटन करण्यात आले.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.