मोरे,घोडके यांचा कोपरगावात गौरव संपन्न

मोरे,घोडके यांचा कोपरगावात गौरव संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शिवसेनेकडून एस.टी.कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी आयोजित केलेल्या युवा शॉर्ट फिल्म स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.तर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मदत कार्य शिर्डी उपविभागाचे समन्वयक स्वच्छता दूत म्हणून कार्यरत असलेले सुशांत घोडके यांना उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून कोविड-१९ संसर्ग विषाणू संकटात आपत्ती निवारणासाठी मदत केल्या प्रकरणी नुकतेच गौरविण्यात आल्याबद्दल त्या दोघांना कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने गौरविण्यात आले आहे.

एखादे ध्येय पूर्ण करायचे असल्यास आपण सतत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.कितीही संकटे आले तरी आपली संघर्ष करण्याची प्रवृत्तीच आपल्याला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते-राजेंद्र झावरे,जिल्हा प्रमुख उत्तर नगर शिवसेना.

एस.टी.कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांनी युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी आयोजित केलेल्या युवा शॉर्ट फिल्म स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.शिर्डी उपविभाग व कोपरगाव तालुक्यात समन्वयक म्हणून दिलेल्या विशेष सेवा आणि योगदानाबद्दल कोविड योद्धा या उपाधीने सुशांत घोडके यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.या दोघांना कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने नुकतेच गपोरविण्यात आले आहे,त्यावेली कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उत्तर शिवसेनेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे हे होते.

सदर प्रसंगी विधानसभा संघटक अस्लम शेख,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,बाळासाहेब जाधव,दिलीप अरगडे,नगरसेविका सपना मोरे,महिला आघाडी उपशहरप्रमुख अश्विनी होने,कलांश उद्योग समूहाचे रोहित काले,उपशहरप्रमुख विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,भूषण पाटणकर,गगन हाडा,आकाश कानडे, गोपाळ वैरागळ, संघटक नितीन राऊत,बाळासाहेब साळुंके,सहसंघटक वैभव गिते,विक्रांत झावरे,योगेश मोरे,विभागप्रमुख रफिक शेख,शैलेश वाघ,मयुर दळवी,किरण आडांगळे,रामदास शिंदे, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे, सतीश शिंगाणे,वाहतूकसेनेचे तालुका प्रमुख पप्पू पेकळे,राकेश वाघ,अविनाश धोक्रट,अविनाश वाघ,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र झावरे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,”आपल्याला एखादे ध्येय पूर्ण करायचे असल्यास आपण सतत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.कितीही संकटे आले तरी आपली संघर्ष करण्याची प्रवृत्तीच आपल्याला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते.सुशांत घोडेके यांना देखिल सामाजिक काम करतांना अनेकदा संघर्ष करावा लागला परंतु देशाप्रती व समाजाप्रती असलेल्या प्रेमामुळे ते कधीही डगमगले नाही.तसेच भरत मोरेंना ही अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी त्यांच्या कठीण काळातही आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले म्हणून आज एवढे मोठे यश त्यांना मिळाले आहे.
यावेळी सुशांत घोडके यांनी कोरोनाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव व राजेंद्र झावरे यांच्या बरोबर काम करत असतानाच्या आठवणींना उजाळा देत छत्रपती शिवाजी महाराजांचे व तसेच संताजी धनाजी यांच्या चरित्राचे वाचन तरुणांना करायला लावले जेणेकरून कधीही आयुष्यात नैराश्य येणार नाही.भरत मोरे यांनी त्यांच्या शॉर्ट फिल्म बद्दल सर्वांना माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल झावरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी मानले.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.