संवत्सर नजीक अपघात,दुचाकी स्वाराचे निधन

संवत्सर नजीक अपघात,दुचाकी स्वाराचे निधन

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात तिरमखे वस्तीजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हनुमानवाडी कान्हेगाव येथील इसम गजानन बबन कराळे (वय-३०) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन त्यात ते गंभीर जखमी होऊन शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार घेताना त्यांचे नुकतेच निधन झाल्याची खबर साईबाबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकऱ्यानी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील संवत्सर वरून वारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्यात ते दि.१७ जुलै रोजी डोक्यास गंभीर दुखापत होऊन जखमी झाले होते.त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारार्थ भरती केले होते.मात्र उपचार आकरणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यांना वाचविण्याची शिकस्त करूनही ते अपयशी ठरले आहेत.

वर्तमान काळात पावसाळा सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे.अनेक रस्ते होत्याचे नव्हते झाले आहे.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील संवत्सर वरून वारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्यात ते दि.१७ जुलै रोजी डोक्यास गंभीर दुखापत होऊन जखमी झाले होते.त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारार्थ भरती केले होते.मात्र उपचार आकरणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यांना वाचविण्याची शिकस्त करूनही ते अपयशी ठरले व त्यांची यात दि.१७ जुलै रोजी प्राणज्योत मालवली आहे.

या प्रकरणी साईबाबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील पोलिसांना खबर केली असून त्यावरून या प्रकरणी त्यांनी आपल्या दप्तरी गु.र.नं.२८/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे या अपघाताची नुकतीच नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही. गवसने हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.