ग्रामीण व शहर विभागाला समान न्याय देणार-आश्वासन

ग्रामीण व शहर विभागाला समान न्याय देणार-आश्वासन

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागाच्या विकास कामांसाठी जवळपास साडे तीन कोटी रुपयांचा निधी मिळविण्यात यश मिळाले असून हद्दवाढ करण्यात आलेल्या भागातील काही रस्त्यांच्या कामाचा यामध्ये समावेश असून ही विकासकामे देखील लवकरच सुरु होणार आहे.विकासाचा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असून विकासाच्या बाबतीत जो न्याय ग्रामीण भागाला दिला तोच न्याय कोपरगाव शहराला देणार असल्याचे आश्वासन आ. आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात दिले आहे.

कोपरगाव शहरातील नगर परिषद हद्दीतील विविध प्रभागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण,भुयारी गटार बांधकाम,रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण,पेव्हिंग ब्लॉक बसवणे,रस्त्याचे खडीकरण व काँक्रीटीकरण आदी कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार,माधवी वाकचौरे,सुनील शिलेदार, रेखा काले,धरमशेठ बागरेचा,रमेश गवळी,बाळासाहेब रूईकर,राजेंद्र वाकचौरे,राहुल देवळालीकर,दिनकर खरे,सुनील बोरा,दत्तोबा जगताप,भरत मोरे, आनंद जगताप,अतुल काले,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की,मागील पाच वर्षात सातत्याने कोपरगाव शहराच्या प्रश्नांसाठी लढत असतांना शहरातील नागरिकांनी मोलाची साथ देवून विधानसभा निवडणुकीत दिलेल्या मताधिक्क्याने माझी जबाबदारी वाढली आहे.शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न हाती घेवून हे काम लवकरात लवकर कसे मार्गी लावता येईल त्यासाठी प्रयत्न करीत आहे.त्याबरोबर शहर वासियांचे इतरही प्रश्न अनुत्तरीत असून ग्रामीण भागाप्रमाणे शहरातील विकास देखील गल्ली बोळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून शहर व ग्रामीण भागाचा सारखाच विकास करून विकासाचा समतोल राखणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.