..या गावात पाच बेशिस्त तरुणांवर पोलिसांची कारवाई !

..या गावात पाच बेशिस्त तरुणांवर पोलिसांची कारवाई !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आपल्या तोंडाला मास्क न लावून नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न निर्माण होईल असे वर्तन विनाकारण गर्दी केल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलिसानी ओमप्रकाश कोयटे यांच्या घराजवळ निवारा या भागातील रहिवाशी असलेले तरुण संदीप भास्कर चौधरी,(वय-३५),व त्याचाच भाऊ प्रवीण भास्कर चौधरी (वय-३०) व राहुल दिलीप पगारे (वय-२२) रा.गवारे नगर,अंकुश संभाजी कर्पे (वय-३०) रा.संवत्सर,सागर भानुदास वाळुंज (वय-२९) रा.जुना टाकळी नाका, कोपरगाव या पाच जणांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुका प्रशासन व शहर पोलीस आपल्या जीवाचे रान करून शहरातील नागरिकांची काळजी घेता असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात आली असताना आता पुन्हा रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे मात्र काही तरुण या बाबत अद्याप गंभीर व्हायला तयार दिसत नाही.त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

देशात कोरोना विषाणूने कहर केला आहे.अनेकांना आपल्या जीवाला हकनाक मुकावे लागत आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नगर जिल्ह्यात ३६ जण बाधित झाले आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.तरीही काही तरुण व नागरिक या बाबतीत गंभीर व्हायला तयार नाही हि अत्यंत दुखदायी घटना मानावी लागेल.तालुका प्रशासन व शहर पोलीस आपल्या जीवाचे रान करून शहरातील नागरिकांची काळजी घेता असताना मोठ्या संख्येने नागरिकांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात आली असताना आता पुन्हा रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे मात्र काही तरुण या बाबत अद्याप गंभीर व्हायला तयार दिसत नाही.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आपला खाक्या दाखवत टाकळी रस्त्यांनजीक असलेल्या कोयटे यांच्या घराजवळ या पाच तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१४८ व १४९/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१, प्रमाणे फिर्यादी पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ (वय-३३) व जयदीप दामोदर गवारे (३४) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड व डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.या आधीही कोपरगाव पोलिसानी अनेक प्रतिष्ठीतांविरुद्ध कारवाई करून दणका दिला आहे त्यात आता या दोन गंह्यातील पाच तरुणांच्या कारवाईची भर पडली आहे.त्यामुळे उडानटप्पू तरुणांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.