काश्मीर : लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक 

संपादक-नानासाहेब जवरे

श्रीनगर :

जम्मू -काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ग्रेनेड हल्ले करत आहे. दरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये सीआरपीएफ, लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्याकडून मोठय़ा प्रमाणात दारूगोळा हस्तगत केला आहे. सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. सीआरपीएफनं अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी दानिश चन्ना याला सोपोरमधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, 5 ऑक्टोबरला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील उपायुक्त कार्यालयाबाहेर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात 14 जण जखमी झाले होते. तसंच गेल्या महिन्यात युरोपीय संघाच्या सदस्यांच्या काश्मीर दौऱयाच्या एक दिवस आधी सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी एका बसथांब्यावर ग्रेनेड हल्ला केला होता.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.