माजी आ. काळेंच्या काळातील अर्धवट योजनांचे आ. आशुतोष काळेंसमोर आव्हान !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मात्र माजी आ. अशोक काळे यांच्या कार्यकाळात अर्धवट राहिलेल्या अनेक योजनांना गत सत्ताधाऱ्यांनी साधा स्पर्श केलेला नाही यात सुमारे तीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अर्धवट इमारत,उजनी चारी तथा रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजना,कोपरगाव नगरपरिषदेचा पाच क्रमांकाचा साठवण तलाव,जुना मुंबई-नागपूर मार्ग आदी योजना तशाच अर्धवट राहिल्या आहेत आता विरोधी पक्षात राहून या योजना पूर्ण करण्याचे आव्हान कोपरगावचे नवोदित आ. आशुतोष काळे यांच्या समोर असल्याने ते त्यात सफल होणार का ? असा सवाल नागरिकांतून डोके वर काढू लागला आहे.

युती शासनाच्या काळात तत्कालीन सरकारने राज्य टँकरमुक्ती योजना राबून राज्यातील खेडी टँकर मुक्त करण्याची घोषणा केली होती.मात्र तत्कालिन सरकारने मुदतपूर्व राजीनामा दिल्याने सहा गावांची 5.96 कोटी रुपयांची रांजणगाव देशमुख,धारणगावसह सहा गावांची धारणगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना,कासलीची पाणी पुरवठा योजना, अद्याप तशाच कलंक शोभा मिरवत आहे.या शिवाय त्याच काळात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी 1993 साली रांजणगाव देशमुख येथे तेरा गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने व पुढील काळात युती शासन सत्तेत आल्याने या गावांची तहान भागविण्यासाठी 3.93 कोटींची उजनी चारी तथा रांजणगाव देशमुख उपसा योजना मंजूर केली होती.मात्र तीही युती शासनाच्या काळात पूर्ण झाली नव्हती.तिलाही त्या नंतर सत्तेत आलेल्या तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांनी पिंडाला कावळा शिवत नाही तसा स्पर्श केला नव्हता.त्या नंतर सत्तेत आलेल्या शिवसेनेचे आ.अशोक काळे यांनीही आपण या योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती.

कोपरगाव विधान सभेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न होऊन अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी बाजी मारून आपल्या पदरात आमदारकी पाडून घेतली आहे.त्यांच्या विजयाचे मतदारसंघात बरेच ढोलताशे बडवले गेले आहेत.त्यांच्या विजयानंतर परतीच्या पावसाने त्यांच्या समोर नमनालाच समस्यांचा पाढा वाढून ठेवला आहे.त्या बाबत त्यांनी अद्याप सत्तेची सूत्रे घेण्याच्या आधीच बैठक लावून महसूल व कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.तथापि ज्या शेतकऱ्यांनी आपली खरिपाची पिके आपल्या खळ्यावर आणून टाकली आहेत.त्यांच्या वर तोंड झोडण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.कारण कृषी व महसूल प्रशासनाने त्यांचे पंचनामे करण्यास नकार दिला आहे.त्यामुळे शेतकरी पेचात सापडले आहेत.त्यातून ते कसा मार्ग काढणार ही खरी समस्या आहे.त्या खेरीज माजी आ.अशोक काळे तथा नवोदित आ. आशुतोष काळे यांचे पिताश्री यांच्या काळातील कोपरगावचा साठवण तलाव क्रमांक पाचचे भिजत घोंगडे मागील सत्ताधाऱ्यांनी अद्याप तसेच ठेवले आहे. सदरचा प्रश्न त्यांना प्राधान्यक्रमाने घ्यावा लागणार आहे.कारण गत पाच वर्षात त्यावरच सर्व राजकारणाची खिचडी पकली आहे.त्याला यश मिळाले नाही हा भाग अलाहिदा ! त्यासाठी माजी आ. काळे यांनी दोन कोटींचा निधी मार्च 2011 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूरही केला होता.मात्र त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्याला अंगठा दाखवत तो अव्यवहार्य ठरवून तो निधी सहीसलामत परत पाठवून दिला. व निळवंडेच्या बंदिस्त जलवाहिणीचे गाजर दाखवून दिशाभूल केली होती.त्यातच पाच वर्षाचा कालखंड निघून गेला होता.त्या साठी आशुतोष काळे यांनी पाच क्रमांकाच्या तलावासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केले होते. आता बाजी नेमकी उलटी झाली आहे.त्यामुळे त्याचे दायित्व आ. काळे यांच्या माथ्यावर आले आहे.याखेरीज युती शासनाच्या काळात तत्कालीन सरकारने राज्य टँकरमुक्ती योजना राबून राज्यातील खेडी टँकर मुक्त करण्याची घोषणा केली होती.मात्र तत्कालिन सरकारने मुदतपूर्व राजीनामा दिल्याने सहा गावांची 5.96 कोटी रुपयांची रांजणगाव देशमुख,धारणगावसह सहा गावांची धारणगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना,कासलीची पाणी पुरवठा योजना, अद्याप तशाच कलंक शोभा मिरवत आहे.या शिवाय त्याच काळात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी 1993 साली रांजणगाव देशमुख येथे तेरा गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने व पुढील काळात युती शासन सत्तेत आल्याने या गावांची तहान भागविण्यासाठी 3.93 कोटींची उजनी चारी तथा रांजणगाव देशमुख उपसा योजना मंजूर केली होती.मात्र तीही युती शासनाच्या काळात पूर्ण झाली नव्हती.तिलाही त्या नंतर सत्तेत आलेल्या तत्कालीन आ.शंकरराव कोल्हे यांनी पिंडाला कावळा शिवत नाही तसा स्पर्श केला नव्हता.त्या नंतर सत्तेत आलेल्या शिवसेनेचे आ.अशोक काळे यांनीही आपण या योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती मात्र त्यांच्या सत्तेची दहा वर्ष कापरासारखी उडून जाऊनही हे काम तसेच धूळखात पडून राहिले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत या इमारतीसाठी माजी.आ. काळे यांनी निधी मंजूर केला व त्याचे बहुतांशी काम पूर्ण झालेले असताना अंतर्गत थोडी बहुत कामे,व बाह्य संरक्षण भिंत एवढेच कामे बाकी असताना त्याला नंतर सत्तेत आलेल्या मावळत्या आ.कोल्हे यांनी कवडीची किंमत दिली नाही.आता पुन्हा माजी आ. काळे यांचे सुपुत्र आशुतोष काळे तालुक्याच्या सत्तेत आले आहे त्यामुळे या योजनांचे काय होणार हा प्रश्न ओघाने निर्माण झाला आहे.युती शासनाच्याच कालखंडात नागपूरला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून घोटी मार्गे मुंबई नागपूर महामार्ग तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाकांक्षी मार्ग म्हणून निधी मंजूर केला होता. तोही पाच वर्षात पूर्ण होऊ शकला नाही.

तीच बाब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत या इमारतीसाठी माजी.आ. काळे यांनी निधी मंजूर केला व त्याचे बहुतांशी काम पूर्ण झालेले असताना अंतर्गत थोडी बहुत कामे,व बाह्य संरक्षण भिंत एवढेच कामे बाकी असताना त्याला नंतर सत्तेत आलेल्या मावळत्या आ.कोल्हे यांनी कवडीची किंमत दिली नाही.आता पुन्हा माजी आ. काळे यांचे सुपुत्र आशुतोष काळे तालुक्याच्या सत्तेत आले आहे त्यामुळे या योजनांचे काय होणार हा प्रश्न ओघाने निर्माण झाला आहे.युती शासनाच्याच कालखंडात नागपूरला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून घोटी मार्गे मुंबई नागपूर महामार्ग तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाकांक्षी मार्ग म्हणून निधी मंजूर केला होता. तोही पाच वर्षात पूर्ण होऊ शकला नाही.त्यानंतर आलेल्या आघाडी शासनात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी तो मार्ग नाशिक व येवला मार्गाकडे वळता करून या रस्त्याला अंगठा दाखवला होता.त्यानंतर दहिगाव ता.वैजापूर जवळ हा मार्ग अद्यापही तसाच आहे.अनेक ठिकाणी पूल बांधणीची कामे तसीच पडून राहिली गत भाजप सरकारात या रस्त्यांची साधी डागडुजीही झाली नाही.सध्या हा रस्ता तर मृत्यूचा सापळाच बनला आहे.रस्ता कमी व खड्डेच जास्त अशी अवस्था झालेली आहे.तालुक्यातील रस्त्यांची तर पार वाट लागून गेली आहे. त्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.राज्यात सत्ता स्थापन झाल्यावर त्या बाबत आ. आशुतोष काळे यांची भूमिका स्पष्ट होणार आहे दहा तारखे पर्यंत जुन्याच सरकारचे राज्य आहे.तरीही काही युवराज आताच रस्त्यांच्या नावाने गळे (नगर-मनमाड ) काढायला लागून तालुक्यात चांगला विनोद निर्माण करत आहेत. या सर्व कामांसाठी आता आ. आशुतोष काळे यांना थोडा अवधी द्यावा लागणार आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.