पुणतांबा येथील शेतकऱ्यांचा संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून काढला-आशुतोष काळेंचा आरोप

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुके दुष्काळी जाहीर झाले असतांना कोपरगाव तालुका मात्र वगळला गेला ज्या विश्वासाने कोपरगाव मतदार संघातील मतदारांनी २०१४ ला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांनी विश्वासघात करून पुणतांबा येथील शेतकऱ्यांचा संप मोडून काढला असल्याचा आरोप कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे चासनळी, धामोरी, मोर्विस, बक्तरपूर, वडगाव, मंजूर, कारवाडी आदी गावांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गाडे होते.

सदर प्रसंगी स्नेहलताई शिंदे, सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, उपसभापति अनिल कदम, तसेच पंडितराव चांदगुडे, सोमनाथ चांदगुडे, वसंतराव गरुड, प्रभाकर आहेर, नारायण मांजरे, माधवराव खिलारी, भास्करराव मांजरे, एकनाथ तीरसे, श्रीराम राजेभोसले, दिलीप पायमोडे, भगवान माळी, पुंडलिक माळी, सर्जेराव सोनवणे, अशोक बैरागी, अनंत गाडे, बाबासाहेब गाडे, साहेबराव गाडे, काशिनाथ जाधव, सोमनाथ कांगणे, प्रभाकर भारती, मच्छिंद्र बर्डे, कचरू घुमरे, सुधाकर आवारे, दिलीपराव चांदगुडे, प्रभाकर चांदगुडे, विकास चांदगुडे, भाऊसाहेब गाडे, सुधाकर तिडके, श्रीकृष्ण गाडे, सुदामराव गाडे, सोमनाथ घुमरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव मांजरे, अशोकराव तीरसे, मीननाथ बारगळ, सचिन चांदगुडे, अशोक मुरलीधर काळे, अरुणराव चंद्रे आदी मान्यवरांसह तसेच परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील पाच वर्षात या परिसरातील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चासनळी-दहिवाडी रस्त्याचे काम सुरु झाले त्यावेळी तालुक्याच्या आमदारांना जाग आली. मंजूर बंधार्‍याची डागडुजी व देखभाल करण्याचे काम त्यांच्याकडे होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २०१६ ला गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मंजूर बंधारा वाहून गेला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी या पुरात वाहून गेल्या. त्यावेळी मी या बंधार्‍याची पाहणी करून हा बंधारा माझ्याकडे द्या असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते व तालुक्याच्या आमदारांना सांगितले होते. परंतु हा मंजूर बंधारा माझ्याकडे देण्यात त्यांना कमीपणा वाटला.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,मागील पाच वर्षात या परिसरातील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चासनळी-दहिवाडी रस्त्याचे काम सुरु झाले त्यावेळी तालुक्याच्या आमदारांना जाग आली. मंजूर बंधार्‍याची डागडुजी व देखभाल करण्याचे काम त्यांच्याकडे होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २०१६ ला गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मंजूर बंधारा वाहून गेला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी या पुरात वाहून गेल्या. त्यावेळी मी या बंधार्‍याची पाहणी करून हा बंधारा माझ्याकडे द्या असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले होते व तालुक्याच्या आमदारांना सांगितले होते. परंतु हा मंजूर बंधारा माझ्याकडे देण्यात त्यांना कमीपणा वाटला. त्यांनी त्यावेळी या बंधार्‍याची तात्पुरती मलमपट्टी करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी केलेली मलमपट्टी किती तकलादू होती हे २०१९ च्या महापुराने दाखवून दिले असून याहीवेळी मंजूर बंधारा वाहून गेला. शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या व त्याची झळ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसली आहे. यावर्षी या बंधाऱ्यात पाणी साचते का नाही याची मला चिंता असून याला सर्वस्वी जबाबदार तालुक्याच्या आमदार आहेत. २०१४ ला केलेल्या चुकीमुळे पाच वर्ष हा त्रास सहन करावा लागला त्यामुळे शेतकरी सुद्धा तालुक्याच्या आमदारांना वैतागलेले असल्याचे काळे यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. यावेळी मंजूर येथील कोल्हे गटाचे विठ्ठलराव तांगतोडे, अमोल तांगतोडे, सचिन तांगतोडे, संभाजी तांगतोडे,धोंडीराम तांगतोडे, प्रसाद तांगतोडे, बाळासाहेब तांगतोडे, सुनील बोरावके,बबन पगारे, ज्ञानेश्वर दुशिंग, किसन दुशिंग, संदीप दुशिंग आदी कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटामध्ये प्रवेश केला. उपस्थितांचे आभार माधवराव खिलारी यांनी मानले

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.