कोपरगाव आज कडकडीत बंद,बाधित रुग्णांत वाढ

कोपरगाव आज कडकडीत बंद,बाधित रुग्णांत वाढ

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठल्याने आज पासून कोपरगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे वर्तमानात सुरु असलेली साखळी तुटण्यास मदत होणार आहे.या पासर्श्वभूमीवर आज असताना आज केलेल्या १६२ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये ३४ रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून १२८ संशयीतांचे अहवाल निरंक आले आहे,तर उपचारानंतर ३५ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून नगर येथे पाठवलेल्या ११ अहवालात ३ बाधित तर खाजगी प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवालात ३ असे असून ४० रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०७ हजार ७९१ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३३ लाख ९२ हजार ३६७ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ६१ हजार ७२५ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ३३ हजार ५६८ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २३ हजार ४४४ वर जाऊन पोहचला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १८ हजार ५०१ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २७१ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील देर्डे चंदवाद येथील माजी उपसरपंच केशवराव होन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आता मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५ झाली आहे.गत चार दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.आज आलेल्या यादीत शहरात १८ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे जनता टाळेबंदीची मागणी प्रशासनाने मान्य करून ती आज पासून सुरु केली आहे.त्याला नागरिकांनी शतप्रतिशत प्रतिसाद दिल्याने आज कोपरगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.त्या बद्दल प्रशासने समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान आज नगर येथून आलेल्या बाधित रुग्णांत अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ २७ वर्षीय पुरुष,गजानन नगर येथील पुरुष वय-४५),संजीवनी कारखाना येथील मुलगा वय-१४) आदींचा तर खाजगी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात खडकी येथील पुरुष वय-२४) तर पंचायत समिती समोर पुरुष वय-४२)तर तर संजीवनी कारखाना महिला (वय-४०) आदींचा समावेश आहे.तर शहरात ३६ बाधित रुग्ण तर ग्रामीण ४ रुग्ण बाधित असे ४० रुग्ण बाधित आढळले आहे.शहरातील अन्य रुग्ण पुढील प्रमाणे गांधीनगर येथील दोन तरुण (वय-२०,२२),साईसिटी महिला (वय-६०),खडकी पुरुष (वय-५५),धारणगाव रोड, कोपरगाव दोन रुग्ण पुरुष (वय-५६),महिला (वय-६०),गजानननगर येथील मुलगी (वय-१४),टिळकनगर येथे सर्वाधिक १२ रुग्ण निघाले असून यात पाच पुरुष असून यात दोन मुलांचा समावेश आहे. (वय-३२,४४,३५,१७,१०),महादेवनगर येथील एक पुरुष (वय-५२),सराफ बाजार एक महिला (वय-३७),काले मळा येथे सहा बाधित पुरुष (वय-७६,५५,२१,४१,४४,५५) तर महिला तीन बाधित निघाल्या असून त्यांचे (वय-३९,४८,४१) आहेत.गिरमेचाल येथील एक पुरुष बाधित असून त्यांचे (वय-५५) आहे.

दरम्यान तालुक्यात ४ रुग्ण बाधित निघाले असून यात लौकी येथील दोन रुग्ण असून यात एक तरुण (वय-२२).तर महिला (वय-४७),याशिवाय सोनेवाडी येथे एक तरुण (वय-२७),मुर्शतपूर येथील एक पुरुष (वय-४०) आदी चार जणांचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ८०२ इतकी झाली आहे.त्यात १८१ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८७ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार ७३४ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १४ हजार ९३६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.४७ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ६०६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७५.५६ टक्के झाला आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.