..त्या व्यापाऱ्यांवर पहिली कारवाई करा-मागणी

..त्या व्यापाऱ्यांवर पहिली कारवाई करा-मागणी

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७०९ इतकी झाली आहे.त्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे याला जशी जनतेची वृत्ती कारणीभूत आहे तशी व्यापारी आपला व्यवसाय करताना तोंडाला मुखपट्टी बांधताना दिसत नाही त्यामुळे या व्यापाऱ्यांवर व बेशिस्त ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचं असल्याचे स्पष्ट प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे यांनी नुकतेच केले आहे.

अद्यापही काही नागरिक व व्यापारी या साथींचे गांभीर्य ओळखून घ्यायला तयार नाही.त्या शिवाय अनेक जण अद्यापही आपल्या तोंडाला मुखपट्टी बांधायला तयार नाही हि अत्यंत गंभीर बाब असून अनेक जण अद्यापही गुटखा,तंबाखू खाऊन शहरांतील वातावरण दूषित करताना दिसत आहे.अनेक व्यापारी आपला व्यापार करताना हि जोखीम समजून घ्यायला तयार नाही.त्यामुळे अशा बेशिस्त नागरिकांना पोलीस प्रशासनाने गजाआड करणे गरजेचे आहे.तरच या प्रवृत्तीस आळा बसेल-डॉ.गर्जे

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ४३३ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २२७ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७०९ इतकी झाली आहे.त्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८९ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार २७८ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १३ हजार ११२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २०.८९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ४६९ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६८.४६ टक्के झाला आहे.व अनेक नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक या साथीचे बळी गेले आहे.तर अनेक जण शेवटच्या घटका मोजत आहे.त्यामुळें शहरात खळबळ उडाली आहे.अद्यापही काही नागरिक व व्यापारी या साथींचे गांभीर्य ओळखून घ्यायला तयार नाही.त्या शिवाय अनेक जण अद्यापही आपल्या तोंडाला मुखपट्टी बांधायला तयार नाही हि अत्यंत गंभीर बाब असून अनेक जण अद्यापही गुटखा,तंबाखू खाऊन शहरांतील वातावरण दूषित करताना दिसत आहे.अनेक व्यापारी आपला व्यापार करताना हि जोखीम समजून घ्यायला तयार नाही.त्यामुळे अशा बेशिस्त नागरिकांना पोलीस प्रशासनाने गजाआड करणे गरजेचे आहे.तरच या प्रवृत्तीस आळा बसेल.त्याशिवाय शहरात रॅपिड टेस्ट कुटुंबनिहाय करून सर्वांच्या तपासण्या करणे गरजेचे आहे.मात्र या पातळीवर शुकशुकाट का दिसतो ? घोडे कुठे अडले आहे हे समजायला मार्ग नाही.राजस्थान,मालेगाव,धारावी व केरळच्या पार्श्वभूमीवर या तपासण्या केल्या तर संशयित रुग्ण लक्षात येऊन त्याना वाचविता येऊ शकते.व कोरोना साखळी तोडण्यात हि कारवाई महत्वाची ठरू शकते.

कोपरगाव डॉक्टर संघटनेने या बाबत छत्रपती संभाजी चौकात जनजागृती केली तरीही नागरिक अद्याप ऐकत नाही.उलट काही नागरिक डॉक्टरांची बदनामी करत आहे.सर्दी पडशाला पुण्या-मुंबईला जावे लागत असल्याची सामाजिक संकेतस्थळावर टीका-टिपणी होते हे दुर्दैवी आहे.त्यामुळे या लढाईत काम करणारांचा उत्साह मावळतो.

आम्ही कोपरगाव डॉक्टर संघटनेने या बाबत छत्रपती संभाजी चौकात जनजागृती केली तरीही नागरिक अद्याप ऐकत नाही.उलट काही नागरिक डॉक्टरांची बदनामी करत आहे.सर्दी पडशाला पुण्या-मुंबईला जावे लागत असल्याची सामाजिक संकेतस्थळावर टीका-टिपणी होते हे दुर्दैवी आहे.त्यामुळे या लढाईत काम करणारांचा उत्साह मावळतो.तेंव्हा अशा प्रतिक्रिया नागरिकांनी टाळाव्या असे आवाहन करून महामारीचा सर्वाधिक फायदा हा किराणा,व तत्सम व्यापाऱ्यांना व मोठ्या आलिशान कॉर्पोरेट हॉस्पिटलला वा वैद्यकीय क्षेत्राला झाला आहे.मात्र त्यातील किती फायदा डॉक्टरांना मिळाला हा संशोधनाचा विषय आहे.हे समजून न घेता नागरिक टीका करत आहे.तरी याबाबत नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे.अनेक देशांनी नियम पाळून कोरोनाला पराभूत केल्याची उदाहरणे त्यांनी दिली असून उगीच साप-साप म्हणून भुई बडवणे योग्य होणार नाही.असेही आवाहन करून त्यांनी जनतेने अद्याप वेळ गेलेली नाही.आपल्या चुका टाळल्या तर कोरोनाला सहज ठरवता येईल असा विश्वास डॉ.अजय गर्जे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.