कोपरगाव शहरात बेशिस्त आठ आरोपींवर गुन्हे दाखल

कोपरगाव शहरात बेशिस्त आठ आरोपींवर गुन्हे दाखल

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोना विषाणूची साथ अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या साठी पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून बावीस ऑगष्ट रोजी सकाळ पासून केलेल्या कारवाईत आठ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातून नऊ बेशिस्त नागरिकांवर मुखपट्टी न बांधल्याबाबत व बेशिस्त वाहन रस्त्यात उभे केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ६४५ इतकी झाली आहे.त्यात १९६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत १२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आता कडक धोरण अवलंबले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण १२० अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात ५० रुग्ण बाधित आढळले आहे त्यात कोपरगाव शहरातील ३४ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील १६ जण असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ६४५ इतकी झाली आहे.त्यात १९६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत १२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई आज मुख्य रस्ता,बसस्थानक,रिक्षा बँकेसमोर रस्त्यावर करण्यात आली आहे.त्यात आरोपी राजेंद्र कोंडाजी नरोडे (वय-५६) रा.शिवाजी रोड कोपरगाव,रवींद्र विश्वनाथ बागुल (वय-४२),रा.टिळकनगर,अमोल राजेंद्र बागुल (वय-२४) रा.टिळकनगर,अजय देविदास दिवटे (वय-५०) रा.काले मळा,सतीश पोपटराव कहार (वय-४१) रा.मोहिनीराजनगर कोपरगाव,यांने आपले वाहन बेशिस्तपणे रस्त्यावर दुसऱ्या वाहनांना अडथळा होईल अशा रीतीने लावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर आरोपी आयुब इसाक बागवान (वय-४२) रा.नाशिक रोड,नंदकिशोर जगन्नाथ कोठावदे (वय-४२) सिडको नाशिक आदी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ,जयदीप दामोदर गवारे,रामकृष्ण गोरख खारतोडे,नवनाथ धोंडीराम जाधव आदी पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९०,कलम २८३ प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम-१५८,१३०,/१७७,५०,५१/१७७ प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सी.एम.सय्यद,पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे,आर.पी.पुंड,डी.आर.तिकोणे,आदी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.