संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावट करण्यात आली आहे.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने कर्नाटक येथील दानशूर साईभक्त श्री.बसवराज आमंली यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व शनि शिंगणापूर येथील शनेश्वर लाईट डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५.०० श्रींच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे पुजारी उदय वाळुंजकर यांनी विणा, दिलीप सुलाखे यांनी पोथी तर विलास जोशी व चंद्रकांत गोरकर यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ पुजारी उदय वाळुंजकर यांनी प्रथम अध्याय, पुजारी दिलीप सुलाखे यांनी व्दितीय अध्याय, पुजारी विलास जोशी यांनी तृतीय अध्याय, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी चौथा अध्याय व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.
उत्सवाचे निमित्ताने सकाळी ६.३० वाजता पुजारी उदय वाळुंजकर यांनी सपत्नीक समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती झाली. सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन झाले. सायं.०७.०० वाजता श्रींची धुपारती व रात्रौ १०.३० वाजता शेजारती करण्यात आली. तसेच श्री साईसच्चरित पारायाणासाठी व्दारकामाई मंदीर रात्रभर उघडे ठेवण्यात आले.यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने कर्नाटक येथील दानशूर साईभक्त श्री.बसवराज आमंली यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व शनि शिंगणापूर येथील शनेश्वर लाईट डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
उद्या उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक ०५ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती होणार आहे. ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. तसेच रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
Leave a Reply