संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या जम्प रोप स्पर्धेत शारदा इंग्लिश मेडिअमच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार केला आहे.
कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मेडिअमच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी येथे जम्प रोप स्पर्धेत सहभागी होवून लक्षवेधी यश संपादन केले होते. यामध्ये विद्यार्थी कु. समर्थ महेश मोरे, ध्रुव हेमंत गंगवाल, श्रेयांश अवधकिशोर नायक, निखिल दिवाकर भारती यांचा सामावेश आहे. या विद्यार्थ्यांनी बजावलेली कामगिरी अभिमानास्पद असून या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व त्यांना प्रोत्साहन देणारे पालक यांचा देखील सिंहाचा वाटा असून या विद्यार्थ्यांच्या यशामुळे कोपरगावची मान निश्चितपणे उंचावणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमहेमुद शेख, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, शारदा इंग्लिश मेडिअमचे प्राचार्य के.एल. वाकचौरे, क्रीडाशिक्षक धनंजय देवकर, गणेश वाघ, महेश मोरे, हेमंत गंगवाल आदी उपस्थित होते.
Leave a Reply