दिवसेंदिवस रोजगारांच्या संधी कमी होत असल्याने भविष्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी तालुक्यातील जिरायती भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
दिवसेंदिवस रोजगारांच्या संधी कमी होत असल्याने भविष्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी तालुक्यातील जिरायती भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मनोली, ओझर खुर्द येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभप्रसंगी विखे बोलत होते. तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, जि.प.च्या सदस्य कांचनताई मांढरे, भगवान इलग, ज्ञानदेव वर्पे आदी या वेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, टेक्स्टाइल पार्कसाठी केंद्र सरकारची आíथक मदत घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच ते सहा हजार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असल्याने सूतगिरण्यांची दुरवस्था झाली आहे. वायदे बाजारामुळे आजची साखर जून, जुलैमध्येच विकली गेली आहे. एकूणच शेतीमालाचा धंदा आतबट्टय़ाचा झाल्याने शेतक-यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यातून शेती उत्पादन वाढवावे लागेल.
राज्यातील वीस लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात शाश्वत कोरडवाहू अभियान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले असून, या योजनेतील प्रत्येक गावात तीन वर्षांत तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत अशी माहिती विखे यांनी दिली. पारंपरिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतक-यांचे आíथक उत्पन्न वाढेल असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Leave a Reply