ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कराड तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिका-यांनी कराड पंचायत समितीसमोर निदर्शने करून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.
ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कराड तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिका-यांनी कराड पंचायत समितीसमोर निदर्शने करून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष व्ही. जे. जगताप, उपाध्यक्ष दीपक हिनुकले, महिला अध्यक्ष प्रतिभा थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांनी पंचायत समितीसमोर जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदोन्नतीच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेत्या ग्रामसेवकांना दोन आगाऊ वेतनश्रेणी द्याव्यात, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षांचा कालखंड सेवापुस्तकात नोंद करावा, २० ग्रामपंचायतींसाठी एक विस्तार अधिकारी नियुक्त करावा, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना स्वतंत्र यंत्रणेद्वारे राबवण्यात यावी या अन्य मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक संघटना शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाचा मार्ग ग्रामसेवक व ग्रामविकास अधिका-यांनी स्वीकारत सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर शासनाला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Leave a Reply