नगर : जिल्ह्यत आज, मंगळवारी ३ हजार ९६३ करोनाबाधित आढळले तर २ हजार ५६६ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या चोवीस तासांत उपचार घेणाऱ्या ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण करोनाबळींची संख्या २ हजार १६४ झाली आहे.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार २५२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८६.३० टक्के झाले आहे. आज रुग्णसंख्येत ३ हजार ९६३ ने वाढ झाल्याने उपचारार्थी रुग्णसंख्या आता २३ हजार ७५१ झाली आहे.
आज आढळलेले बाधित पुढीलप्रमाणे— नगर शहर ६२२, नगर तालुका ४१४, राहता ३१९, राहुरी ३१७, पारनेर ३०९, श्रीरामपूर २९७, संगमनेर २८८, कोपरगाव २४५, निवासी २३५, शेवगाव २१७, जामखेड १७४, श्रीरामपूर १४७, पाथर्डी ११९, इतर जिल्ह्यतील १०१, भिंगार ७०, अकोले ५०, कर्जत २७, लष्करी रुग्णालयातील ७ व राज्याबाहेरील ५.
आज करोनामुक्त झालेले पुढीलप्रमाणे—मनपा ५७८, अकोले ११४, जामखेड ८६, कर्जत १०६, कोपरगाव ११९, नगर तालुका १९१, नेवासा १०९, पारनेर १०६, पाथर्डी ९७, राहाता ३०१, राहुरी २१५, संगमनेर १४०, शेवगाव ६७, श्रीगोंदा १५८, श्रीरामपूर १३८, भिंगार १८ व इतर जिल्ह्यतील २३.
अँटीजेन संचाचा तुटवडा
जिल्ह्यत सध्या करोना चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या अँटीजेन संचाचा तुटवडा भासत आहे. आठवडय़ापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही बाब मान्य केली होती. मात्र त्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. या किटच्या दरात कंपन्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बाजारातून जिल्हा सरकारी रुग्णालयांना त्याची खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यस लवकरच २५ हजार व पालकमंत्र्यांनी पाठवलेल्या १० हजार किट उपलब्ध होतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले. काल, सोमवारी अचानक जिल्ह्यतील करोनाग्रस्तांची संख्या निम्म्याने घटली होती. त्याचे कारणही किटचा तुटवडा हेच होते. त्यामुळे चाचण्या कमी झाल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 5, 2021 12:52 am
Web Title: in the district today coronary arthritis patients became coronary ssh 93
Copyright ©
2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
Leave a Reply