राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कांग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा की विधानसभा, अशी चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपानेही चव्हाण यांच्या विरोधात राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जावयालाच रिंगणात उतरवले आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे जागावाटप निश्चित झाले होते. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने पहिली यादी घोषित केली. तर मंगळवारी ५२ दुसरी यादी जाहीर केली होती. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख समावेश आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आणि पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांये जावई डॉ. अतुल भोसले उमेदवारी दिली आहे. भाजपाने डॉ. अतुल भोसले यांना उतरवल्याने आता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विरुद्ध काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचे जावई अशी लढत रंगणार आहे.
डॉ. अतुल भोसले हे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या कन्येचे पती आहेत. शिवाय कराडचे युवा नेते अशी डॉ. भोसले हे यांची ओळख आहे. ते सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर “त्यांना जनतेने आमदार करावे, आम्ही मंत्री करतो”, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात केली होती. आज भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपात गेले. त्यानंतर त्यांच्याविरोधात उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही चर्चेत आले. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सभांमधून सांगितले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 2, 2019 9:18 am
Web Title: bjp give ticket to late chief minister vilasrao deshmukh son in law against prithviraj chavan bmh 90
Copyright ©
2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
Leave a Reply