जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय पक्षा) चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.श्रीहरी बागल,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप पवार व राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यानी आज दि.१९ सप्टेंबर पासुन पांच दिवसाचा पश्चिम महाराष्ट्र व नाशिक,धुळे जिल्ह्याचा दौरा सुरु केला असल्याची माहिती या पक्षाकडून प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात अवकाळी पावसाने शेती व फळभागाचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे होऊन आपदग्रस्त शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी व मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे अशी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांची भुमिका आहे-अड्.श्रीहरी बागल
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात अवकाळी पावसाने शेती व फळभागाचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे होऊन आपदग्रस्त शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी व मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे अशी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांची भुमिका आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण कसे मिळेल व या साठी शांततेने कसा मार्ग निघेल या बद्दल जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे .
कोणताही अनुचित प्रकार घडु नये.समाजात कायदा व सुव्यवस्था टीकुन राहण्यासाठी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.केंद्र सरकारने कांद्या निर्याती वरील बंदी उठवण्यासाठी लेखी निवेदन नाशीक जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.सदर दौऱ्यात येवला व परिसरातील शेतकरी वर्गाशी चर्चा करण्यात येणार आहे.स्वच्छता कामगार,डॉक्टर,वर्गाचे प्रश्न समजुन त्यांना न्याय देण्यासाठी महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणुन जिल्हानिहाय दौरे सुरु केले असल्याची माहितीही प्रदेश अध्यक्ष अड्.श्रीहरी बागल यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे..
Leave a Reply