कोरोना रुग्णांना मिळणार रेमडेसीविर मोफत !

कोरोना रुग्णांना मिळणार रेमडेसीविर मोफत !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोव्हिड-१९ कॊरोना सारख्या जागतिक साथीच्या धर्तीवर रेमडेसीवीर औषधावर राजकारण न करता बांगलादेश प्रमाणे भारतातही रेमडेसिविर औषध तयार करून ते मोफत वाटप करणे बाबत पंतप्रधान,मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आदींकडे मागणी केली होती त्या मागणीला यश आल्याचा दावा श्री संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केला आहे.

आज सरकारने महाराष्ट्र व दिल्ली सह ५ राज्यांना रेमडेसिविर या कॊरोना विषाणू वरील प्रायोगिक औषधाच्या २० हजार लहान बाटल्या पाठविले कळविले आहे.या औषधासाठी भारतात ‘कोव्हिफोर’ हे नाव निश्चित करण्यात आले असून तेलंगणा,गुजरात तसेच तामिळनाडू या राज्यांनाही या औषधाचा पुरवठा केला जाणार आहे.

अमेरिकेतील जिलाद सायन्सेस गीलेड सारख्या कंपनीने या आधी सुध्दा बर्ड फ्लूची साथ आली होती तेव्हा टैमी फ्लु औषध,लस शोधून तयार केली होती. त्यांनीच आता कोव्हिड-१९, कॊरोना वर रेमडेसीवीर औषध शोधले होते तसेच या रेमडेसिव्हिर औषधाचा वापर बाबत अमेरिकेत तसेच जागतिक आरोग्य संघटना मध्ये सुद्धा मतभेद आहेत तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी लोकांसाठी हे औषध वापरण्यास परवानगी दिली आहे.त्याच प्रमाणे भारतात हे औषध बनवण्यासाठी सुद्धा सिप्ला,ज्युबिलंट लाईफसायन्सेस,हैदराबादची हेटेरो ड्रगस आणि मायलँन या चार प्रमुख कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. तसेच भारतात ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांनी सुध्दा हे औषध वापरता येईल अशी परवानगी दिली असतानाही २ जुन रोजी केंद्र सरकार आरोग्य खात्याची दिल्लीस्थित पत्रकार परिषद झाली त्यामध्ये अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे औषध वापरायला परवानगी दिली आहे.तरी सुध्दा केंद्र सरकार यावर कुठलाच ठोस निर्णय घेत नाही त्या अनुषंगाने श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले होते.

गर्भवती तसेच स्तनपान देणाऱ्या महिला,यकृत व मूत्रपिंड विकार असणारे रुग्ण,१२ वर्षांखालील मुलांना हे औषध देता येणार नसल्याचेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान हे औषध इंदूर,भोपाळ,कोलकाता,लखनौ,पाटणा,कोची,त्रिवेंद्रम, भुवनेश्वर,रांची,विजयवाडा आणि गोवा या ठिकाणी दुसऱ्या टप्य्यात पोहचवण्यात येणार आहे-सचिन गुलदगड,श्री संत सावता माळी युवक संघ अध्यक्ष सचिन गुलदगड

आज सरकारने महाराष्ट्र व दिल्ली सह ५ राज्यांना रेमडेसिविर या कॊरोना विषाणू वरील प्रायोगिक औषधाच्या २० हजार लहान बाटल्या पाठविले कळविले आहे.या औषधासाठी भारतात ‘कोव्हिफोर’ हे नाव निश्चित करण्यात आले असून तेलंगणा,गुजरात तसेच तामिळनाडू या राज्यांनाही या औषधाचा पुरवठा केला जाणार आहे.हैदराबाद येथील ‘हिटेरो’ या औषधनिर्माण कंपनीला ‘रेमडेसिविर’ या प्रायोगिक औषधाचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली असून १०० मि.लि.ग्रॅम बाटलीच्या औषधाची किंमत ५ हजार ४०० इतकी आहे.औषधाची मात्रा प्रौढांसाठी पहिल्या दिवशी २०० मि.लि.ग्रॅम आणि नंतर ५ दिवस दररोज १०० मि.लि.ग्रॅम इतकी असेल.सध्या फक्त सरकार आणि हॉस्पिटल मार्फत हे औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. श्री संत सावता माळी युवक संघाच्या मागणीस यश मिळाल्या बद्दल संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.