जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भाजप सरकारच्या काळात सुस्त असलेल्या विमा कंपन्यांना सरकारने समज दिल्यामुळे या कंपन्यांनी हवामान आधारित फळपिक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १० लाख ५५ हजार ५१८ रुपये जमा केले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आज पर्यंत कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१९-२० चे ठिबक सिंचनचे एक कोटी चोवीस लाख लाख रुपयांचे अनुदान महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात येवून हि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालीं आहे.मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे १९.६७ कोटी रुपयांची मतदार संघातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे-आ.काळे
मागील सरकारच्या काळात थकीत असलेली शेतकऱ्यांची देणी मिळावी यासाठी राज्याचे कृषिमंत्री ना.दादा भुसे व पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यामुळे आजपर्यंत कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना २०१९/२० चे ठिबक सिंचनचे एक कोटी चोवीस लाख लाख रुपयांचे अनुदान महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात येवून हि अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेलीं आहे.मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे १९.६७ कोटी रुपयांची मतदार संघातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे. शेतकऱ्यांची उर्वरित देणीही तातडीने मिळावी यासाठी पाठ्पुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकार आल्यापासून पंतप्रधान पिक विमा योजना असेल किंवा हवामान आधारित फळपिक विमा असेल या कंपन्यांना शासनाने शेतकऱ्यांची देणी तातडीने द्या अशी तंबी दिली होती.त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यावाचून या कंपन्यांना गत्यंतर राहिलेले नाही.डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना देखील तातडीने हवामान आधारित फळपिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे.त्याबाबत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना सूचना देण्यात आल्या असून डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना देखील लवकरच विम्याची रक्कम मिळणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.
Leave a Reply