जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्रांम्हणगाव शिवारातील सतत होणाऱ्या पावसामुळे बंधारा फुटून धारणगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून तोंडाशी आलेले पिक वाया गेले आहे.या खरीप पिकांची पाहणी पंचनामा करण्यास सुरुवात करण्यात अली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कोपरगाव तालुक्यासह राज्यात परतीच्या पावसाने हैदोस घातला आहे.खरीप पिके हातातून जाण्याचा धोका वाढला आहे.अनेकांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेला खरिपाची घास हिसकावून जाण्याची हाती शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे.त्या पिकांचे पंचनामे करण्याची तातडीची गरज आहे.
गत काही दिवसापासून कोपरगाव तालुक्यासह राज्यात परतीच्या पावसाने हैदोस घातला आहे.खरीप पिके हातातून जाण्याचा धोका वाढला आहे.अनेकांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेला खरिपाची घास हिसकावून जाण्याची हाती शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे.त्या पिकांची व शेताची आज पाहाणी करण्यासाठी कामगार तलाठी धनंजय पह्राड धारणगाव,सौ.सोळसे मॅडम,कृषी सहायक,ग्रामसेविका पुनम आहीरे, भाऊसाहेब बारहाते,माजी सरपंच संदीप देवकर,बापुराव चव्हाण,गोपाळ समाज संघ,अमोल आचारी,बळीराजा पार्टी तालुकाध्यक्ष,पोपट महाजन,गणेश देवकर,पिनू तांबे,भाऊसाहेब देवकर,व धारणगांव शिवारातील शेतकरी उपस्थित होते.पिकांचे नुकसान पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
Leave a Reply