संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत चारूदत्त रमेश गायकवाड संचालक असलेल्या सेतू कार्यालयाचे उदघाटन आज सकाळी साडे दहाच्या सुमारास महानुभाव आश्रमाचे संचालक महंत राजधारबाबा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य एस.एल.परजणे हे होते.
सदर प्रणालीमध्ये जातीच्या अर्जासाठी आवश्यक सर्व जोडपत्रे स्कॅन करून जतन केली जातात. सर्व कागदपत्रांची तपासणी अव्वल कारकून यांचे मार्फत झाल्यानंतर स्कॅनिग करून ती नागरिकांना तात्काळ परत दिली जातात. अर्ज स्वीकृतीनंतर नागरीकांस संगणकीकृत टोकन देण्यात येते, त्यावर टोकन क्रमांक, बार कोड, मोबाईल क्रमांक दिला जातो. सदर मोबाईल नबंरवर एस.एम.एस.द्वारे टोकन नंबर पाठवल्यास नागरिकांना अर्जाची सद्यस्थिती कळविण्यात येते.
राष्ट्रीय ई-शासन योजना अंतर्गत सर्व सरकारी सेवा सामान्य नागरिकांना घरपोच मिळण्याच्या दृष्टीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील एकूण २७ मीशन मोड प्रोजेक्ट (एम.एम.पी.) ची संकल्पना विकसित करण्यात आलेली असून सी.एस.सी. कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात ग्रामपातळीवर सेतू केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ज्याद्वारे विविध शासकीय सेवा सामान्य नागरिकांना पुरविण्यात येतात. महाराष्ट्र राज्यात महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून या सेवा देण्यात येत आहेत. राज्यात कार्यान्वित असलेल्या सर्व सेतू केंद्रांचे नियंत्रण जिल्हा सेतू समिती आणि राज्य पातळीवर राज्य सेतू समिती कडून करण्यात येते. विविध जिल्ह्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून या केंद्रांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या प्रक्रीयेत पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याचा प्रयत्न केला आहे.संवत्सर येथे अशी सुविधा निर्माण केली असून त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.
सदर प्रसंगी गोदावरी-परजने तालुका सहकारीदूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नानासाहेब जवरे,अशोक थोरात,रामभाऊ निरगुडे, लक्ष्मण परजणे,चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मण साबळे, बंडूनाना आचारी, ज्ञानेश्वर कासार,राजेंद्र भाकरे,सुभाष लोखंडे,अविनाश गायकवाड,धीरज देवतरसे, दिनेश दिंडे, पंढरेनाथ आबक,राजेंद्र ठाकरे आदींसह बहुसंख नागरिक, महिला उपस्थित होत्या.
त्यावेळी महंत राजधार बाबा म्हणाले कि,पूर्वीच्या काळी अर्जुनाने एकावेळी अनेक बाण सोडण्याची विद्या संपादन केली होती महाभारतातील संजयाने धृतराष्ट्राला युद्धभूमीवर काय चाललेले आहे हे दूरदर्शन सांगण्याची कला अवगत केली होती त्या मानाने आजचे विज्ञान मागे म्हटले पाहिजे असा शेरा मारला व तरीही या सेतू कार्यालयाने नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार असल्याने त्यानां दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.त्या वेळी त्यांनी गायकवाड कुटुंबियांचे गावाप्रती असलेले योगदान विशद करून सेतू केंद्रचालक चारुदत्त गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी राजेश परजणे म्हणाले कि, सेतूच्या माध्यमातून सामान्य नागरीकांना देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रांपैकी विविध जातीचे दाखले देणे ही एक अत्यंत महत्वाची सेवा आहे. ग्रामीण स्तरावर स्विकारलेल्या जातीच्या प्रमाणपत्रासाठीच्या अर्जांचे संकलन आणि छाननी तालुकास्तरावर होऊन सर्व अर्ज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले जातात. उपविभागीय स्तरावर ह्या अर्जांची तपासणी झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांच्या स्तरावर त्यावर कार्यवाही होऊन प्रमाणपत्र स्वाक्षरीत होतात. अर्जाची संचिकेवर दोन कार्यालयात नोंदणी होत असल्यामुळे या अर्जांच्या कार्यवाहीस उशीर लागतो.यात सुधारणा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रारंभी महानुभाव आश्रमाचा सातबारा नोंदीचा उतारा काढून या केंद्राचे उदघाटन महंत राजधर बाबा यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी पत्रकार नानासाहेब जवरे,अशोक थोरात आदींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार शिवाजी गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन लक्ष्मण साबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार चारुदत्त गायकवाड यांनी मानले.
Leave a Reply