संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात अद्याप कोरोना बाधित रुग्ण थांबण्याचे नाव घेत नसून दि.२३ जुलै पाठवलेल्या १२ जणांचे अहवाल आज सकाळी आले असून यात पॉवर हाऊस नजीक कोर्ट रोड येथील डॉक्टर च्या कुटुंबातील पत्नी (वय-६०),मुलगा(३४),सून (२९) असे तिघे बाधित आल्याचे निष्पन्न झाले असून ९ जण निरंक आले असल्याची माहिती मिळाल्याची बातमी प्रसिद्धी होऊन त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत एक (३३ वर्षीय) व कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील (५२ वर्षीय),साई सिटी येथील २३ वर्षीय व २५ वर्षीय पुरुष आणि रुईकर वस्ती येथील २० वर्षीय तरुण असे एकूण आठ जण आज रोजी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून इतर बारा जण निरंक आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात बाधितांची संख्या आता ३९ वर पोहचली आहे.अद्यापपर्यंत या साथीत कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेलेले आहेत.आता पढेगाव,कोपरगाव शहरांतील दोन मिळून आता येथील एका रुग्णाची त्यात भर पडून ही संख्या ४३ वर गेली आहे.या घटनेने प्रशासन अजून सतर्क झाले आहे.
कोपरंगाव शहरातील वीज मंडळाच्या पॉवर हाऊस जवळ असलेल्या एका दवाखान्याचे एक डॉक्टर बाधित निघाल्यावर त्यांच्या संपर्कात असलेल्या एका चाळीस वर्षाचा इसम व रवंदे येथील बाधित इसमाची पत्नी आज कोरोना बाधित असल्याची धक्कादायक बातमी दोन दिवसांपूर्वी हाती आली होती.त्यामुळे ते रहात असलेला साईनगर परिसर तालुका प्रशासकांनीं हा भाग ताबडतोब प्रतिबंधित केला होता.त्यामूळे बाधितांची तालुक्यातील संख्या आता छत्तीसवर गेली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली होती.त्या नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या बारा जणांचे श्राव ताब्यात घेण्यात आले होते व ते नगर येथील प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठविले होते.ते आज सकाळीच आले असून त्यात हा खुलासा झाला आहे.त्यामुळे नागरिकांना आणखी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज पॉवर हाऊस नजीक कोर्ट रोड येथील डॉक्टर च्या कुटुंबातील पत्नी (वय-६०),मुलगा(३४),सून (२९) असे तिघे बाधित आल्याचे निष्पन्न झाले असून ९ जण निरंक आले आहे.दरम्यान पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत एक (३३ वर्षीय ) व कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील (५२ वर्षीय),साई सिटी येथील २३ वर्षीय व २५ वर्षीय पुरुष आणि रुईकर वस्ती येथील २० वर्षीय तरुण असे एकूण आठ जण आज रोजी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.आता कोपरगाव शहर व तालुक्यात बाधितांची संख्या आता ३९ वर पोहचली आहे.अद्यापपर्यंत या साथीत कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेलेले आहेत.आता पढेगाव येथील एका रुग्णाची त्यात भर पडून ही संख्या ४३ वर गेली आहे.या घटनेने प्रशासन अजून सतर्क झाले आहे.व पोलिसानी आणखी कडक धोरण अवलंबले असून मुखपट्टी न बांधणाऱ्या बेताल नागरिकांवर कारवाईची संख्या वाढल्याच्या घटनांत वाढ झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी आता आणखी रुग्ण वाढ न होण्यासाठी सतर्क राहून प्रशासनास मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Leave a Reply