जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दत्तनगर येथी रहिवाशी असलेल्या आपण गल्लीतून फिरत असताना आरोपी संदीप शिरसाठ,रवी कुंदे,अमित लकारे,स्वप्नील मंजुळ,पप्पू शेंडगे,रोहन कदम सर्व रा.दत्तनगर यांनी दारू पिऊन विनाकारण आपल्याला मारहाण केली असल्याची फिर्याद मनज्योतसिंग अमरजितसिंग भाटिया (वय-२२) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.या घटनेत एक जण जखमी झाला आहे.
मनज्योतसिंग भाटिया हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फिरत असताना वरील सहा आरोपी यांनी दारू पिऊन फिर्यादी भाटिया व साक्षिदार यांना दत्तमंदिरासमोर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विनाकारण शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आरोपी संदीप शिरसाठ याने हातात दगड घेऊन सतनामसिंग यांचे डोक्यात मारून दुखापत केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मनज्योतसिंग भाटिया हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फिरत असताना वरील आरोपी यांनी दारू पिऊन फिर्यादी भाटिया व साक्षिदार यांना दत्तमंदिरासमोर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विनाकारण शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली आरोपी संदीप शिरसाठ याने हातात दगड घेऊन सतनामसिंग यांचे डोक्यात मारून दुखापत केली आहे.यात ते जखमी झाले आहे.या शिवाय दगड मारून दुचाकी व नळ जोडणीचे नुकसान केले आहे.व घाण-घाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या बाबत फिर्यादी भाटिया यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८४१/२०२० भा.द.वि.कलम १४३,१४७,१४९,३२४,३२३,५०४,५०६ ४२७,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४४ प्रमाणे वरील सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस कोरेकर हे करीत आहेत.
Leave a Reply