जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील गोदामगल्लीत व स्टेट बँकेच्या समोर असलेल्या डॉ.राजेश माळी यांच्या दवाखान्यात एक्सरे ऑपरेटर असलेले रवींद्र जयराम देवकर यांची होंडा एच.एफ.डिलक्स (क्रं.एम.एच.१७ बी.बी.३९५२) हि अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे दुचाकीस्वारात खळबळ उडाली आहे.
दि.१४ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे जाकीट घातलेल्या व आतील शर्टवर इंग्रजी अक्षरे असलेल्या अज्ञात भरभक्कम शरीर यष्टी असलेल्या इसमाने त्याची दुचाकीच्या खोपडीजवळ काहीतरी गडबड करून ती चालू करून थोडे अन्तर ती चाकी लोटत नेऊन नंतर चालू करून पळवून नेली असल्याचे तेथे असलेल्या चलचित्रणात दिसून येत आहे.
तक्रारदार रवींद्र देवकर हे टाकळी ता.कोपरगाव येथील मूळ रहिवाशी आहे.ते डॉ.राजेश माळी यांच्या दवाखान्यात आपली सेवा बजावत आहेत.त्यांनी आपली दुचाकी नेहमी प्रमाणे दि.१३ डिसेंबर रोजी रात्र पाळीस आले असता त्यांनी नेहमी प्रमाणे आपली वरील क्रमांकाची दुचाकी दवाखान्याच्या खाली उभी करून ठेवली असता दि.१४ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे जाकीट घातलेल्या व आतील शर्टवर इंग्रजी अक्षरे असलेल्या अज्ञात भरभक्कम शरीर यष्टी असलेल्या इसमाने त्याची दुचाकीच्या खोपडीजवळ काहीतरी गडबड करून ती चालू करून थोडे अन्तर ती चाकी लोटत नेऊन नंतर चालू करून पळवून नेली असल्याचे तेथे असलेल्या चलचित्रणात दिसून येत आहे.
त्यांनी या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता त्यांनी त्यांना काही काळ शोध करा सापडली नाही तर गुन्हा दाखल करू असे आश्वासित केले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस समक्ष उपस्थिती राहून दिली आहे.शहरात चोऱ्या,दुचाकी चोरी व अन्य चोऱ्यांचे सत्र सुरु झाले असून यावर पोलिसांनी सत्वर कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Leave a Reply