जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायत हद्दीत असललेल्या मारुती मंदिराच्या मागील बाजूस दोन भावांची भांडणे सोडविण्यास गेलो असता आरोपी जालिंदर अण्णा सोनवणे,किसन अण्णा सोनवणे,नंदा अण्णा सोनवणे आदींनी आपल्याला दि.१२ डिसेंबरच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा फिर्यादी विकास पोपट खंडीझोड (वय-२०)यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
आरोपी जालिंदर सोनवणे व त्याच्या भावाचे किरकोळ कारणावरून दुपारी भांडण झाले होते.ते सोडविण्याचे काम फिर्यादी विकास खंडीझोड याने केले याचा राग मनात धरून आरोपी जालिंदर सोनवणे व त्यांचे अन्य साथीदार यांनी फिर्यादी सायंकाळी घरी जात असताना त्यास एकट्यास गाठून आपल्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादी विकास खंडीझोड यास जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी विकास खंडीझोड व आरोपी जालिंदर सोनवणे हे भोजडे येथील वीट भट्टीवर विटा थापण्याचे काम मजुरीने करतात.त्यातील आरोपी जालिंदर सोनवणे व त्याच्या भावाचे किरकोळ कारणावरून दुपारी भांडण झाले होते.ते सोडविण्याचे काम फिर्यादी विकास खंडीझोड याने केले याचा राग मनात धरून आरोपी जालिंदर सोनवणे व त्यांचे अन्य साथीदार यांनी फिर्यादी सायंकाळी घरी जात असताना त्यास एकट्यास गाठून आपल्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादी विकास खंडीझोड यास जखमी केले आहे.त्या बाबत त्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास फिर्याद दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५५१/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी जालिंदर सोनवणे, किसान सोनवणे, नंदा सोनवणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.
Leave a Reply