जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक १६२/१ मधील विहिरीत असलेली उज्वल कंपनीची इलेक्टरीक जलपरी विद्युत पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दत्तात्रय रामदास पाटोळे (वय-४२) यांनी दाखल केला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांचा रब्बी पिके उभारण्याचा हंगाम जोरात सुरु असून त्याला सुरेगाव ग्रामपंचायत हद्दतीत शेतकरीही अपवाद नाही.सुरेगाव हद्दीत शेतजमीन असलेले शेतकरी दत्तात्रय पाटोळे यांच्या वरील गट क्रमांकाच्या शेतजमिनीत विहीर असून त्या विहिरीत त्यांनी वरील कंपनीची जलपरी बसवली होती तीच रात्रीत अज्ञात चोरट्यानी फरार केली आहे.
वर्तमानात शेतकऱ्यांचा खरीप पिके काढून त्या जागी रब्बी पिके उभारण्याचा हंगाम जोरात सुरु असून त्याला सुरेगाव ग्रामपंचायत हद्दतीत शेतकरीही अपवाद नाही.सुरेगाव हद्दीत शेतजमीन असलेले शेतकरी दत्तात्रय पाटोळे यांच्या वरील गट क्रमांकाच्या शेतजमिनीत विहीर असून त्या विहिरीत त्यांनी वरील कंपनीची जलपरी बसवली होती. ती दि.०३ डिसेंम्बर सकाळी सहा वाजता ते दि.०४ डिसेंम्बर रोजी संध्याकाळच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.या प्रकरणी त्यांनी अज्ञात चोऱट्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५४८/२०२० भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करीत आहेत.
Leave a Reply