जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील नामांकित समता नागरी सहकारी पतसंस्थेने पतसंस्था मे २०२० रोजी श्रीरामपूर शहरात शाखा सुरु करून गत २० वर्षात १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याची माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
समता पतसंस्थेने अत्याधुनिक तंत्र प्रणाली वापरून पेपरलेस,व्हौचरलेस तसेच कॅशलेस बँकिंग कामकाज करण्याचा प्रयत्न केला आहे.समताचे ऑडीट कंट्रोल रूम तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.समताने गत ६ महीन्यांपासून सोने तारण कर्ज वाटपावर भर दिला आहे.विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने सोने तारण कर्ज मिळाले पाहिजे या उद्देशाने समताने सोनेतारण कर्ज वाटपाच्या विवीध योजना जाहीर केल्या आहेत-संदीप कोयटे,संचालक
याबाबत अधिक माहिती देतांना संदीप कोयटे म्हणाले कि,२००० साली श्रीरामपूर मध्ये केवळ २-३ नागरी सहकारी पतसंस्था तग धरून होत्या.कर्जदारांनी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्या अडचणीत आलेल्या होत्या.त्यामुळे श्रीरामपूर मध्ये सहकारी पतसंस्था काढण्याची कोणी हिंमत करीत नव्हते. त्या काळात समताचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी श्रीरामपूर येथे शाखा काढण्याचे जाहीर केले.या शाखेला श्रीरामपूरकरांनी साथ दिली व पहिल्याच वर्षात १ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या.त्यानंतर पुढील ५ वर्षात म्हणजे २००५ साली या ठेवी ५ कोटी रुपया पर्यंन्त गेल्या होत्या. त्या पुढील ५ वर्षात म्हणजे २०१० साला पर्यंत या ठेवी २० कोटींच्या ठेवी पूर्ण झाल्या होत्या. त्या पुढील ५ वर्षात म्हणजे २०१५ साली विक्रमी टप्पा गाठत या ठेवी ३५ कोटी रुपया पर्यंन्त गेल्या व काल ३० सप्टेंबर २०२० पर्यंत हा ठेवींचा आकडा १०० कोटी रुपयां पर्यंन्त गेला आहे. हा समाजाचा समतावर वाढत असलेला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटलें आहे.
समता पतसंस्थेने अत्याधुनिक तंत्र प्रणाली वापरून पेपरलेस,व्हौचरलेस तसेच कॅशलेस बँकिंग कामकाज करण्याचा प्रयत्न केला आहे.समताचे ऑडीट कंट्रोल रूम तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.समताने गत ६ महीन्यांपासून सोने तारण कर्ज वाटपावर भर दिला आहे.विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने सोने तारण कर्ज मिळाले पाहिजे या उद्देशाने समताने सोनेतारण कर्ज वाटपाच्या विवीध योजना जाहीर केलेल्या आहे.सोने तारणकर्ज घेणाऱ्या सर्व कर्जदारांनी खाजगी वित्तीय संस्थांकडून फसव्या व्याजदराने सोने तारण कर्ज घेण्याऐवजी सहकारी पतसंस्थेकडून सोनेतारण कर्जाचा व्यवहार करावा.तसेच किरकोळ दुकानदारांसाठी ठोक व्यापाऱ्यांकडून रोखीने व कमी व्याजदरात कर्ज घेण्यासाठी शुअर सेल शुअर पेमेंट हि योजना देखील कार्यान्वित केली असल्याने त्यांचा देखील फायदा किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.१०० कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण झाल्याने समताची जबाबदारी आता अधिक वाढली आहे.अशा प्रसंगी समतावर विश्वास ठेऊन जो समताचा सन्मान केला आहे.त्या सन्मानास या पुढेही पात्र राहून श्रीरामपुराचे सेवेत अधिकाधिक जोमाने कार्यरत राहू असे सभासद,ठेवीदार,कर्जदारांना आश्वासित केले आहे.
Leave a Reply