जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोन विषाणूचे राज्यातून उच्चाटन करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” या मोहिमेच्या माध्यमातून सकारात्मक परिणाम पुढे आले आहेत.नागरिकांनी आपल्या आरोग्या विषयी दिलेल्या माहितीतून कोरोनाची सौम्य व तीव्र लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या जास्तीत अँटीजन टेस्ट गरजेचे असून त्यामुळे बाधित रूग्णापर्यंत पोहोचून कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होईल असा आशावाद आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
“माझे कुटुंब,माझी जबाबदारी”या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत जावून त्या घरातील कुटुंबाच्या आरोग्याची माहिती घेत आहेत.त्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे जाणवत असणाऱ्या नागरिकांवर तातडीने उपचार होत आहेत.मात्र दुर्दैवाने काही नागरिकांच्या घरी आजारी व्यक्ती असून देखील नागरिक खरी माहिती देत नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहे-आ.काळे
कोपरगाव तहसील कार्यालय येथे आज आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे,तहसीलदार योगेश चंद्रे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,डॉ.वैशाली बडदे,डॉ.गायत्री कांडेकर,आशा गटप्रवर्तक,आशा सेविका व आरोग्य सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरु केलेल्या“माझे कुटुंब, माझी जबाबदारी”या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत जावून त्या घरातील कुटुंबाच्या आरोग्याची माहिती घेत आहेत.त्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे जाणवत असणाऱ्या नागरिकांवर तातडीने उपचार होत आहेत.मात्र दुर्दैवाने काही नागरिकांच्या घरी आजारी व्यक्ती असून देखील नागरिक खरी माहिती देत नसल्यामुळे अशा नागरिकांना अचानकपणे त्रास वाढून हे नागरिक कोरोनाबाधित असल्याचे पुढे येत आहे.त्यामुळे नागरिकांनी न घाबरता पुढे येवून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास स्वतःहून तपासणी करून घेतल्यास आपले,व आपल्या कुटुंबाचे व आपल्या तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होण्यास मदत होईल.त्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेच्या माध्यमातून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.आशा गटप्रवर्तक,आशा सेविका,आरोग्य सेविका व आरोग्य विभागाचे कर्मचारी या मोहिमेच्या माध्यमातून आपली जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल आ.काळे यांनी कौतुक केले.सर्व कुटुंबांची तपासणी करून एकही कुटुंब आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन शेवटी केले आहे.
Leave a Reply