कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ८३६ इतकी झाली आहे.त्यात १२९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे कारवाई अटळ मानली जात आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने कहर केला असून दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट बाधित रुग्णांची संख्या २३ झाली आहे त्यात कोपरगाव शहरातील १४ बाधित निघाले तर ग्रामीण भागातील १५ जण असे २९ नागरिक बाधित असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १ हजार ८३६ इतकी झाली आहे.त्यात १२९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ३३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली आहे.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई काल दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान केलेल्या कारवाईत शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी कुलदीप रमेश लोंगाणी (वय-३१),राममंदिर रोड,दीपक बाबुराव कुमावत (वय-३०),इंदिरानगर,संकेत विश्वनाथ दरेकर (वय-१८),चांदवड ता.मनमाड,संदीप अशोक पवार,(वय-२०),रा,येवला नाका,कोपरगाव,विनोद गोपाळ लोंगाणी,(वय-२५),रा.माळी बोर्डिंग कोपरगाव,पवन नामदेव फंकराळें,(वय-३५), रा.रवंदे,प्रवीण नानासाहेब बाचकर,(वय-२०),चांदगव्हाण,आदीं सात जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गादीवर फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश न पाळणे आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७३०/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे हे करीत आहेत.
Leave a Reply