कोपरगावच्या ग्रामीण भागात पुन्हा रुग्ण वाढ

कोपरगावच्या ग्रामीण भागात पुन्हा रुग्ण वाढ

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २७६ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात २० बाधित आढळले आहे.तर ३४ संशयित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून दिले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील १४ तर नगर येथील प्रयोग शाळेत १२ स्राव तपासणीसाठी पाठवले आहेत.आज एकूण बाधित ३४ रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.दरम्यान आज आढळलेली रुग्ण वाढ आज पर्यंत मोठी असून ग्रामीण भागात १५ तर शहरी भागात १९ रुग्ण वाढले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३७ हजार ५२९ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६१३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत दोन दिवसात तीन बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.

आज आलेल्या यादीत शहरात १५ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात १९ असे ३४ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज कोपरगाव शहरी भागात आढळलेल्या बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे-संभाजीनगर महिला वय-२१,बागुल वस्ती पुरुष वय-४७,सुभद्रानगर पुरुष वय-५२,१८ व महिला वय-४२,साईधाम पुरुष वय-२४,साईनगर महिला वय-४९,खडकी दोन महिला वय-५१,३०,मोहनिराज नगर पुरूष वय- ७१ व महिला वय-९१ संजयनगर दोन पुरुष वय-२६,६०,व महिला वय-४९,बँक रोड पुरुष वय- ३१आदींचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागातील बाधित रुग्ण पुढील प्रमाणे शहाजापूर एक पुरुष वय-११,शिंगणापूर पुरुष वय-५८,कान्हेगाव तीन पुरुष वय-३५,२०,२५,दोन महिला वय-१४,१६,चांदेकसारे दोन पुरुष वय-२९,५४,एक महिला वय-६२,वारी पुरुष वय-४७,साकरवाडी पुरुष वय-४५,रवंदे तीन पुरुष वय-२०,५१,४७,दहिगाव बोलका पुरुष वय-३७,बक्तरपूर पुरुष वय-४६,एक महिला वय-३७,सोनारी एक पुरुष वय-२९,आदींचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ६६५ इतकी झाली आहे.त्यात १९४ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २९ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७४ टक्के आहे.आतापर्यंत ०७ हजार ३८५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २९ हजार ५४० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २२.५४ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १४५६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८७.८४ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण भागातील मोठ्या बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.