आज आलेल्या यादीत शहरात ३२ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात असे २१ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण ५३ संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे सुभद्रानगर दोन पुरुष वय-१७,११,एक महिला वय-३५, अन्नपूर्णानगर दोन महिला वय-२५,४६,खडकी तीन पुरुष वय-३५,६,३१, तर दोन महिला वय-२१,४६,संभाजी चौक एक महिला वय-३४, टिळकनगर तीन पुरुष वय-१८,३३,५४,एक महिला वय-२७,काले मळा एक महिला वय-४८,जुनी कचेरी एक पुरुष वय-७३,निवारा दोन पुरुष वय-३६,०८,तीन महिला वय-४९,५८,३२,येवला नाका एक पुरुष वय-३८,कर्मवीरनगर दोन पुरुष वय-४६,५८,गांधीनगर एक पुरुष वय-२०,समतानगर दोन पुरुष वय-३,२८,दोन महिला वय-०७,२८,सप्तर्षी मला एक पुरुष वय-३३ आदींचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागात बाधित असलेले रुग्ण पुढील प्रमाणे बहादरपूर एक पुरुष वय-२५,कारवाडी एक पुरुष वय-२०,उक्कडगाव चार पुरुष वय-१८,६०,०८,७३ व तीन महिला वय-१०,१९,६०,पोहेगाव एक पुरुष वय-२४,एक महिला वय-४७,टाकळी एक पुरुष वय-५३,एक महिला वय-४७,कोळगाव थडी एक पुरुष वय-६२,तर सहा महिला वय-२९,६०,२९,२१,६५,५९ तर चासनळी येथे एक पुरुष वय-५८ आदी रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १४८६ इतकी झाली आहे.त्यात १८२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २६ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७४ टक्के आहे.आतापर्यंत ०६ हजार २३५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २४ हजार ९४० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.८३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १२७८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८६.०० टक्के झाला आहे.दरम्यान या विक्रमी बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.
Leave a Reply