जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात वर्तमान स्थितीत कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने व कोरोना उप्पचाराचा खर्च हा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात असल्याने कोरोना तपासणी करणाऱ्या खाजगी प्रयोग शाळांनी आपले दर कमी करावे असे आवाहन शहर शिवसेनेने केले असता त्याला प्रयोग शाळा संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सेनेचे नूतन शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोरोना उपचाराचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना व बाधित रुग्णांना उपचार करणे हि बाब अवघड बनली आहे.हि बाब हेरून जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमूख उपस्थितीत खाजगी प्रयोग शाळांच्या संचालकांची एक बैठक नुकतीच शहर शिवसेनेचे नूतन अध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी घेतली आहे.त्यावेळी या संचालकांनी हा प्रतिसाद दिला आहे.
कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले असले तरी बाधितांत अनेक प्रतिष्ठित नागरिक आढळले आहे.तर कोरोना उपचाराचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेला आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना व बाधित रुग्णांना उपचार करणे हि बाब अवघड बनली आहे.हि बाब हेरून जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमूख उपस्थितीत खाजगी प्रयोग शाळांच्या संचालकांची एक बैठक नुकतीच शहर शिवसेनेचे नूतन अध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी घेतली आहे.त्यावेळी या संचालकांनी हा प्रतिसाद दिला आहे.
यावेळी कोपरगाव शिवसेना शहरप्रमुख कलविंदर सिंग दडीयाल,ग्रामीण रोग्य केंद्राचे वैयद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौन्दर एस.टी. कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे,विधानसभा संघटक अस्लम शेख,युवा कार्यकर्ते विक्रांत झावरे,वाहतूक सेना तालुका प्रमुख इरफान शेख,विभागप्रमुख विकास शर्मा,वासिम शेख,शहर संघटक बाळासाहेब साळुंके, षण पाटणकर,मयुर खैरणार,वाल्मीक चिने,आकाश कानडे,अक्षय नन्नवरे,अक्षय वाकचौरे,गगन हाडा,विशाल झावरे,विजय शिंदे,सचिन मोरे व आदी शिवसैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने खाजगी प्रयोग शाळेला रुपये ८०० इतके शुल्क घेण्यास परवानगी दिली आहे.कोपरगाव शहरात वृंदावन डायग्नोस्टिक सर्विसेस,निदान क्लिनिकल लॅबोरेटरी,सर्वदा क्लीनिकल लॅबरोटरी व कोपरगाव क्लिनिकल लॅबोरेटरी या चार खाजगी प्रयोग शाळा सध्या कविड-१९ रॅपिड तपासणी करतात. शहर शिवसेनेच्या वतीने वरील चार ही प्रयोगशाळांना ८०० रुपये शुल्क आकारण्यास आवाहन केले आहे व तसे फलक या शाळांच्या बाहेर लावण्यास सांगितले आहे.वरील सर्वच प्रयोग शाळानी ८०० रुपये शुल्क आकारण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचे आभार मानले. त्यामुळे कुठल्याही खासगी शाळांनी रुपये ८०० पेक्षा अधिक शुल्क आकारल्यास त्यांचे प्रयोग शाळांचा परवाना रद्द करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच कविड-१९ रॅपिड टेस्ट एस.एस.जी.एम.महाविद्यालय कोपरगाव येथे सकाळी १० ते १२ या वेळेत विनामूल्य सुरू आहे.तरी कोपरगावकरांनी त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply