जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना बाधित गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव कोविड केंद्रात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने जागा पुरेनाशी झाली आहे.शिवाय नगर-मनमाड हा राज्य मार्ग अत्यंत खराब झाल्याने रुग्ण नगर येथे उपचारासाठी नेण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन तास लागत असल्याने सहा रुग्णांना रस्त्यातच आपले प्राण सोडावे लागल्याची गंभीर घटना नुकतीच तहसील कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत उघड झाली होती त्यानंतर आ.काळे यांनी हि भेट घेतल्याने तिला अर्थ प्राप्त झाला आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३० हजार ११३ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४४६ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत १ हजार ३३४ रुग्ण बाधित झाले आहे तर गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले असून अद्याप रुग्णवाढ थांबलेली नाही याशिवाय आता कोविड केंद्रात जागा पुरेनाशी झाली आहे.शिवाय नगर-मनमाड हा राज्य मार्ग अत्यंत खराब झाल्याने रुग्ण नगर येथे उपचारासाठी नेण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन तास लागत असल्याने सहा रुग्णांना रस्त्यातच आपले प्राण सोडावे लागल्याची गंभीर घटना नुकतीच तहसील कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत उघड झाली होती.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी आगामी खडतर कालखंडावर मात करण्यासाठी श्री. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची भेट घेतली आहे. श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवण्याबाबत चर्चा केली.कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आजपर्यंत चोवीस रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे या कोविड केअर सेंटरवर अतिरिक्त ताण पडला आहे.त्यामुळे कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी श्री.साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवल्यास रुग्णांवर वेळेत उपचार होवून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे त्यासाठी बेड आरक्षित ठेवावे व कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी आय.सी.एम.आर.कडे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली असून सदर मागणीस मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचा दावा केला आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,मुख्य लेखा अधिकारी बाबासाहेब घोरपडे,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply