जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ३० हजार ११३ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४४६ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले असले तरी बाधितांत पतसंस्था चळवळीतील अग्रणी नेता व पालिकेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरातील तीन जण बाधित आढळले असून त्यांना स्वतःला विलगीकरण करावे लागले असल्याने नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या १७ तर ग्रामीण भागात १८ असे ३५ रुग्ण बाधित निघाले असून यात खाजगी प्रयोग शाळेतील रुग्ण या वेळी आढळले नाही तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे साईसिटी एक पुरुष वय-५९,महादेवनगर तीन पुरुष वय-३२,७८,५५ तर सहा महिला वय-४९,६५,४८,५१,२७,६५ तर संजीवनी कारखाना एक पुरुष वय-५८,तर दोन महिला वय प्रत्येकी-३०,निवारा पुरुष वय-३८,मांढरे बिल्डिंग पुरुष वय-३६,खाटीक गल्ली पुरुष वय-३२,गोकुळनगरी पुरुष वय-३७ आदी १७ रुग्णांचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण पुढील प्रमाणे धामोरीत दोन महिला वय-२८,४५ उक्कडगाव ८ पुरुष वय-२८,४८,३४,६५,५४,४२,२९,१९ तर ५ महिला बाधित निघाल्या असून यात वय-२४,५७,६७,३२,२५ आदींचा समावेश आहे.तर येसगावात एक महिला वय-२५ चास नळीत एक पुरुष वय-३१ बाधित निघाला आहे.तर खोपडीत प्रथमच एक पुरुष वय-३६ बाधित निघाला आहे.त्या मुळें ग्रामीण भागातही भीती पसरली आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १३३४ इतकी झाली आहे.त्यात १६७ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७९ टक्के आहे.आतापर्यंत ०५ हजार ५६० जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २२ हजार २४० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २३.९९ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ११४३ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८५.६८ टक्के झाला आहे.दरम्यान या विक्रमी बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.
Leave a Reply