मुखपट्या बांधल्या नाही,कोपरगावात दोघांवर गुन्हा दाखल

मुखपट्या बांधल्या नाही,कोपरगावात दोघांवर गुन्हा दाखल

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरांतील ब्रिजलालनगर सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कोपरंगाव शहर पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी आरोपी ऋषीकेश मोहन गवारे (वय-23) वर्षे रा. गोदाम गल्ली कोपरगाव,प्रतिक
कैलास शिंदे( वय-21) वर्षे रा कोर्टरोड कोपरगाव वैभव संजय भडकवाडे( वय-22) रा.निवारा यांनी शहरात कोरोना साथ चालू असल्याची माहिती असतानाही आपल्या तोंडाला मुखपट्टी न बांधता ब्रिजलाल परिसरात आपल्या चारचाकी (क्रं. एम.एच.17 सी.डी.5693) हिच्यावर दाटीवाटीने फिरताना आढळून आल्याने शहर पोलिसानी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बेजबाबदार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरात सध्या कोरोना साथीचे अनेक रुग्ण आढळून आले होते.त्यावर उपचार सुरु होते.ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला,वैजापूर,सिन्नर,नाशिक,नगर,औरंगाबाद,संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.त्यामुळे धोका वाढला आहे.या खेरीज कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोपरगाव,सुरेगाव,वेळापूर,करंजी येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे साथ पसरण्याचा धोका वाढलेला आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.मात्र अद्यापही काही नागरिक आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत.त्यामुळे अन्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो.मात्र जेंव्हा अशा नाठाळ नागरिकांना प्रशासनाची संकेतांची भाषा कळत नाही त्यावेळी पोलिसांना आपल्या दंड्याचे काम नाईलाजाने सुरु करावे लागते.तीच परिस्थिती वर्तमानात उद्भवली आहे.त्यामुळे पोलिसानी काल सायंकाळच्या सुमारास 6.30 वाजेच्या सुमारास असेच बेजबाबदारीचे प्रदर्शन करताना आरोपी ऋषिकेश गवारे व वैभव भडकवाडे यांनी वरील क्रमांकाच्या चारचाकीवरून प्रवास करताना कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा धोका असतानाही आपल्या तोंडावर मुखपट्या न बांधता व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना मोकटपणे फिरताना आढळून आले आहे.
त्यांच्या विरुद्ध फिर्यादी सुरज जीवन अग्रवाल (वय-32)यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.263/२०२० भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७0,290 प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.