संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सुरेगावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे अहवाल येणे बाकी असतानाच काल रात्री उशिरा करंजी ग्रामपंचायत हद्दीत एक ३४ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या १५ व्यक्तींना तालुका आरोग्य विभागाने कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.व त्यांचे श्राव तपासणीसाठी पाठविण्याची तयारी केली आहे.
करंजीतील महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य संशयित १५ व्यक्तींना आज कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे.व त्यांना कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात रवानगी केली असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आता तालुक्यातील सुरेगाव येथील १७ व करंजी येथील १५ असे एकूण ३२ संशयित नागरिकांच्या अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर सुरेगाव येथे पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना बाधित रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली होती.संबंधित रुग्ण उपचारासाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याशी संबंधित अन्य सतरा नागरिकांना ताब्यात घेतले होते.त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असताना करंजीत काल एक महिला बाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे.या महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य संशयित १५ व्यक्तींना आज कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे.व त्यांना कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात रवानगी केली असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आता तालुक्यातील सुरेगाव येथील १७ व करंजी येथील १५ असे एकूण ३२ संशयित नागरिकांच्या अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
Leave a Reply