कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण !

कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण !

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित तेरा रुग्णांचा अहवाल आजच निरंक आला असताना आज सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी व औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत नोकरीस असलेला एक इसम (वय-४५) उपचारार्थ नाशिक येथे दाखल असताना तो बाधित असल्याचा अहवाल आल्याने कोपरंगाव तालुका पुन्हा एकदा कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा धसका घेतला आहे.तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी हा परिसर पुन्हा एकदा प्रतिबंधित करण्यासाठी सुरेंगावकडे धाव घेतली आहे.

आज पर्यंत आरोग्य विभागाने १६५ जणांना ताब्यात घेतले त्यांची तपासणी करून त्यातील १५२ जणांना सोडून देण्यात आले होते तर २२९ जणांचे अहवाल तपासणी करण्यात आली होती. त्यातील १३ जण कोरोना बाधित आढळले होते.तर १२ जण रोगमुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून आज अखेर असलेले प्रलंबित १३ अहवालही आज दुपारी प्राप्त झाले असून ते निरंक आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली असताना त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच सायंकाळी हि धक्कादायक बातमी हाती आली आहे.

कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र आज पर्यंत आरोग्य विभागाने १६५ जणांना ताब्यात घेतले त्यांची तपासणी करून त्यातील १५२ जणांना सोडून देण्यात आले होते तर २२९ जणांचे अहवाल तपासणी करण्यात आली होती. त्यातील १३ जण कोरोना बाधित आढळले होते.तर १२ जण रोगमुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून आज अखेर असलेले प्रलंबित १३ अहवालही आज दुपारी प्राप्त झाले असून ते निरंक आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली असताना त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच सायंकाळी हि धक्कादायक बातमी हाती आली आहे.दरम्यान या कुटूंबात चार भाऊ त्यांच्या पत्नी,आई,वडिल असा मोठा परिवार आता संशयितांच्या यादीत येणार आहे.त्यानां तातडीने विलगीकरण करणे आवश्यक आहे.त्या साठी तालुका तहसीलदार योगेश चंद्रे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,पोलीस निरीक्षक अनिल कटके आदींनी सुरेंगावकडे धाव घेतली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही.मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.दरम्यान हा रुग्ण आधी कोकमठाण येथील ट्रस्टच्या रुग्णालयांत उपचारार्थ भरती केलेला होता मात्र तेथे कोरोना अहवाल निरंक आला होता.त्या नंतर त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते तेथे पुन्हा अहवाल तपासला असता तो बाधित झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांना या घटनेचा धक्का बसला आहे.आता कोपरगाव शहर व तालुका पुन्हा कोरोना यूक्त झाला आहे.त्यामुळे नागरिकांवर पुन्हा एकदा जबाबदारी वाढली आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

Alex Lorel

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua veniam.