संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील चासनळी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत होत्या.याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडून ३ कोटीचा निधी मिळविला होता.या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून या कामाची नुकतीच त्यांनी पाहणी केली आहे.
चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र हे अहमदनगर-नासिक जिल्ह्याच्या सीमेवर असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे दोनशे ते अडीचशे रुग्ण नियमित उपचार घेण्यासाठी येत असतात. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय चासनळी पासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर आहे.त्यामुळे चासनळी व पंचक्रोशीतील गावातील सर्वसामान्य नागरिकांना आजारांवर प्राथमिक स्वरूपातील उपचार घेण्यासाठी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाची भूमिका बजावीत आहे.
मात्र मागील काही वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था अतिशय वाईट झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.याची दखल घेवून आ.काळे यांनी जिल्हा परिषद मार्फत चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारली आहे.या इमारतीचे कामासाठी जिल्हा परिषद सदस्य यांनी पाठपुरावा केला आहे.इमारतीचे काम सुरु झाल्यापासून त्यांचे इतर विकास कामांप्रमाणे या कामावर लक्ष होते. सध्या थैमान घालीत असलेले कोरोना विषाणूचे संकट,सुरु असलेला पावसाळा त्यातून निर्माण होणारे साथीचे आजार यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळावी व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे काम तातडीने पूर्ण व्हावे या उद्देशातून आ.काळे यांनी पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमाताई जगधने,जिल्हा परिषद सदस्य दंडवते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे,भास्कर चांदगुडे,सोमनाथ चांदगुडे,दिलीप चांदगुडे,डॉ.मच्छिन्द्र बर्डे,सुभाष गाडे,अनिल चांदगुडे,प्रभाकर चांदगुडे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,उपअभियंता उत्तम पवार,श्री.दिघे,वैद्यकीय अधिकारी विकास आढाव,ठेकेदार राहुल चांदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply