संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात नुकतेच एकवीस जणांचे श्राव तपासणीसाठी आरोग्य विभागाने ताब्यात घेतले होते त्यांचे अहवाल काल रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास प्राप्त झाले असून त्या पैकी सात जणांचे अहवाल निरंक आले असून आधीचे ५ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला असला तरी अद्याप तीन अहवाल काय असतील या बाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.मात्र या आधी तीन अहवाल प्रलंबित असल्याचे म्हटले होते त्यामुळे आकड्यात आरोग्य विभागाकडून घोळ होत असल्याचे दिसत आहे.या बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क स्थापित होऊ शकला नाही.
कोपरगावातील नागरिकांनी आगामी काळात अजून खबरदारी घ्यावी लागणार आहे.नागरिकांनी अनावश्यक वेळी व प्रसंगी बाहेर पडू नये.व आवश्यक वेळी आपल्या तोंडाला मुखपट्टी बांधण्याची काळजी घ्यावी व तालुक्याबाहेरील बाधित शहरातील आप्तांना विनाकारण आपल्या घरी बोलावून कोरोना साथीला निमंत्रण देऊ नये असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात वर्तमानात कोणताही रुग्ण नसताना आता मंगळवार दि.१ जुलै रोजी धक्कादायक घटना उघड झाली होती कोपरगाव शहरातील खडकी रस्ता मार्गावर असलेल्या ओमनगर परिसरात असलेल्या एका खाजगी डॉक्टरला (वय-४५) व त्यांच्या वडिलांना (वय-७२) या दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या खेरीज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याला (वय-४६) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती.या तीनही कोरोना बाधित रुग्णांना तातडीने कोपरगाव कोरोना केंद्रातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते व हा परिसर तालुका प्रशासनाने प्रतिबंधित केला होता व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांचा शोध सुरु केला होता.त्यात ओमनगर परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.या खेरीज टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या मात्र मुंबई येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात नऊ अशा एकवीस संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.त्यांना तातडीने ताब्यात घेतले होते तर दुसऱ्या टप्प्यात १९ संशयित ताब्यात घेऊन त्यांची कोपरगाव येथील कोरोना केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली होती त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तातडीने पाठवले गेले होते.त्यातील सतरा अहवाल या आधीच निरंक आले होते मात्र नंतर पाठवले गेलेले १९ अहवाल व आधीचे दोन अहवाल असे तेवीस अहवाल प्रलंबित होते पैकी रात्री ६ जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजता वीस संशयितांचे अहवाल आले असून ते निरंक आले होते तर बारा अहवाल प्रलंबित होते ते काल दि.७ जुलै रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास आले असून त्यातील सात जणांचे अहवाल निरंक आले असल्याने प्रशासनासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Leave a Reply