संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ओमनगर परिसरात असलेल्या एक डॉक्टर बाधित सापडल्यावर आता त्यांच्याच घरातील अन्य तीन रुग्ण आढळल्यानंतर आज प्रलंबित असलेले दोन अहवाल आले असून ते दोघेही कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.यात टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील धारणगाव रस्त्यांवरील मुंबई येथून आलेल्या रुग्णांचा मुलगा तर अन्य एक रुग्ण येसगाव येथील महिला असून ती ओमनगर येथील डॉक्टरच्या उपचारार्थ सहवासात आली असल्याची माहिती डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस विचारल्यानंतर दिली आहे.आता कोपरगावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
दरम्यान आज या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी २१ जणांना तालुका आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे.व त्यांना कोपरगाव येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.अजून किमान २० संशयित रुग्ण असू शकतात असा अंदाज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात वर्तमानात कोणताही रुग्ण नसताना आता मंगळवार दि.१ जुलै रोजी धक्कादायक घटना उघड झाली असून कोपरगाव शहरातील खडकी रस्ता मार्गावर असलेल्या ओमनगर परिसरात असलेल्या एका खाजगी डॉक्टरला (वय-४५) व त्यांच्या वडिलांना (वय-७२) या दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या खेरीज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याला (वय-४६) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती.या तीनही कोरोना बाधित रुग्णांना तातडीने कोपरगाव कोरोना केंद्रातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते व हा परिसर तालुका प्रशासनाने प्रतिबंधित केला होता व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांचा शोध सुरु केला होता.त्यात ओमनगर परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ११ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.या खेरीज टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या मात्र मुंबई येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात नऊ संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.त्यांना तातडीने ताब्यात घेतले आहे.व कोपरगाव येथील कोरोना केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली होती त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तातडीने पाठवले गेले होते.ते अहवाल काल सायंकाळी उशिरा आले असून त्यात पंधरा जण निरंक आले आहे.तर या कोरोना बाधित डॉक्टरच्या घरातील आई,बहीण व मुलगी बाधित आढळल्याने खळबळ उडाली होती.तर अन्य दोन संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते ते अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून त्यात मुंबई येथून टाकळी येथे आलेल्या रुग्णांचा मुलगा तर दुसरा रुग्ण हा महिला असून येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील असून हा रुग्ण ओमनगर येथील डॉक्टरच्या सहवासात आपली आरोग्य तपासणीसाठी आला होता.त्यातूनच त्यांना संसर्ग झाला असल्याचे समजते.दरम्यान आज या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी २१ जणांना तालुका आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे.व त्यांना कोपरगाव येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.अजून किमान २० संशयित रुग्ण असू शकतात असा अंदाज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला आहे. आता या वीस जणांचे श्राव जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवले आहे.आता नागरिकांचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
Leave a Reply