संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आज वर्तमानात जरी इंग्रजी भाषेचे प्रभुत्व वाढले असले तरी संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात मराठी भाषा हि घरोघरी पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले असून आपल्या मातृभाषेचा प्रत्येकाला अभिमान असायला हवा असे प्रतिपादन कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्राध्यापक बाबासाहेब वाघ यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला आहे.त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषादिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.
मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला आहे.त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषादिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.राज्य परिवहन महामंडळाच्या कोपरगाव बस आगारचा वतीने आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मराठी भाषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा. एम.एन.शेख.दै.राष्ट्र सह्याद्रीचे वृत्त संपादक नानासाहेब जवरे,कोपरगाव बस आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी,कार्यशाळा अधीक्षक बनकर,कोपरगाव बस स्थानक प्रमुख यु.एम.कुटे,सु.ल.गवळी,सोनाली संगमकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक राजेंद्र खंडिझोड,रावसाहेब थोरात आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,हल्ली आपली मातृ भाषा मराठी माणूस विसरत चालला आहे.वास्तविक मराठी भाषा हि आपल्या सख्या “आई” प्रमाणे असून हिंदी हि “मावशी”प्रमाणे आहे.आता आपल्या मातृभाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे.त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न चालू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.पुणेरी मराठी भाषा हि प्रमाणभूत मानली जात आहे.राज्य सरकारने नुकत्याच राज्यातील सर्व शाळांना मराठी भाषा सक्तीची केली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.व मातृभाषेतूनच सर्व शिक्षण घेणे हि खरी या भाषेला गौरव वाढविणारी घटना ठरेल असा आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आगर प्रमुख अभिजित चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाहतूक नियंत्रक संजय गाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाहतूक निरीक्षक किरण बिडवे यांनी मानले.
Leave a Reply