संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर चौफुली पासुन पुढे रेल्वे पुलाच्या ठिकाणी कांही अज्ञात इसम रस्त्यावरील वाहने अडवून लुट करीत असल्याची खबर कोपरगांव पोलीस ठाण्यास मिळाल्यानंतर आज बुधवार दि 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 1 च्या सुमारांस पोलीसांनी छुपा सापळा रचुन दोन आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे अन्य पाच ते सहा आरोपींनी पोलीसांना पहाताच तेथुन पलायन केले आहे.
या आरोपींकडून पोलीसानी चाकु सुर्या लोखंडी पार्इप,स्टंप,कटावणीसह मोटार सायकल जप्त करुन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस पकडण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.
या संदर्भात माहिती अशी की, 25 फेब्रुवारी रोजी 0.40 वा.सुमारांस रेल्वे ब्रिजवर पाच ते सहा अनोळखी इसम धारदार हत्यार घेवून धमकावून वाहनचालकांची लुट करीत असल्याची कोपरगांव पोलीस ठाण्यास खबर मिळाली. पोलीस निरिक्षक राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.कॉ सोमनाथ राऊत,पो हे कॉ आर पी पुंड असे पोलीस वाहनाने संवत्सर चौफुली ते रेल्वे पुलाकडे निघाले असतां येणार्या जाणार्या लार्इटच्या उजेडात दोन मोटर सायकलवर पाच ते सहा इसम रात्री 1.35 वा. रोडवर उभे राहुन वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुट करीत असल्याचे आढळुन आले. पोलीसांनी त्यांचे वाहन बाजुला लावून छुपा पाठलाग केला त्यातील दोन आरोपी नामे तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग वय 24रा.टिळकनगर,निलेश प्रदिप चव्हाण वय 26 रा.भगवाचौक गांधीनगर कोपरगांव असे मिळुन आले त्यांचेकडून अगझडतीत व त्यांचे ताब्यात असलेले चाकु सुर्या लोखंडी पार्इप,स्टंप,कटावणीसह,विना नंबरची हिरोहोंडा मोटार सायकल जप्त केली. अन्य आरोपी मात्र पळुन जाण्यात यशस्वी झाले. या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी अविनाश भगुरे व त्याचे दोन मित्र रा.कोपरगांव हे देखील सामिल असल्याची माहिती मिळाली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला पकडण्यात पोलीसांना यश आले असून यापूर्वीही या आरोपींना रस्ते लुट प्रकरणात अटक करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली.
कोपरगांव पोलीस ठाण्यात रस्ते लुटीचा गुन्हा वरील सर्व आरोपींवर दाखल झाला आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगांवकर पुढील तपास करीत आहेत.
Leave a Reply