संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या श्री. साई बाबा तपोभूमी येथे साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या साईभक्तांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे या उद्देशातून श्री साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगाव येथे साईभक्तांसाठी शुद्ध पाणपोईचे सुरू करण्यात आली असून या पाणपोईचे उदघाटन नुकतेच माजी आ.अशोकराव काळे यांच्या शुभहस्ते आज पार पडले आहे.
श्री.साईबाबा तपोभूमी हे ठिकाण शिर्डीपासून जवळच असून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.याठिकाणी नियमितपणे धार्मिक कार्यक्रम होत असतात. नगर-मनमाड महामार्गाच्या लागत असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने साई भक्तांची मंदियाळी असते. सकाळ, सायंकाळ होणारी आरती व विविध धार्मिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. तसेच पायी शिर्डीला जाणारे साईभक्त मोठ्या प्रमाणात साई पालख्यांसह याठिकाणी मुक्कामी थांबत असतात. साईबाबांच्या भक्तांसाठी आरओ फिल्टर पाणपोई सुरु केल्यामुळे साईभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सदर प्रसंगी छबुराव आव्हाड, धरमशेठ बागरेचा, काकासाहेब जावळे, उद्धवराव बोरावके, मनोहर कृष्णाणी, रोहित पटेल, बाळासाहेब रुईकर, निलेश उदावंत, गजानन वाणी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. तुषार गलांडे, मुकुंद भुतडा, तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply