संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील चांगल्या डीलरशिपच्या ऑनलाइन शोधात असलेल्या आशावादी तरुणाला, “एम.आर.एफ.टायर कंपनीची डीलर शिप देतो” असे म्हणून गोड-गोड बोलून त्याच्याकडून नोंदणी शुल्क, अनामत रक्कम, उत्पादन नोंदणी परवाना फी आदींच्या नावाखाली खोटी माहिती देऊन खाते क्रमांक देऊन त्यावर वेळोवेळी १९ लाख ७५ हजार ८०० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार द्वारकानगरी येथील फिर्यादी तरुण आशिष रामदास गवळी (वय-२४) याची फसवणूक केली असल्याची गंभीर घटना उघड झाल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले असून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारत आहेत.डेबिट, क्रेडिट कार्ड बंद झाले आहे. ते पुन्हा चालू करायचे असल्यास कार्डची माहिती द्या किंवा ओ.टी.पी. नंबर सांगा. के.वाय.सी.अपडेट करणे, विम्याचे पैसे मिळवून देतो किंवा डीलर शिप मिळवून देतो,नोकरीचे आमिष आदी नाना लीला करून फुकटचा पैसा मिळवण्याचे शुक्लकाष्ठ सध्या वर्तमानात आशावादी तरुणांच्या मागे जोरात सुरु आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले असून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारत आहेत.डेबिट, क्रेडिट कार्ड बंद झाले आहे. ते पुन्हा चालू करायचे असल्यास कार्डची माहिती द्या किंवा ओ.टी.पी. नंबर सांगा. के.वाय.सी.अपडेट करणे, विम्याचे पैसे मिळवून देतो किंवा डीलर शिप मिळवून देतो,नोकरीचे आमिष आदी नाना लीला करून फुकटचा पैसा मिळवण्याचे शुक्लकाष्ठ सध्या वर्तमानात आशावादी तरुणांच्या मागे जोरात सुरु आहे.तर काही आरोपी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर बनावट प्रोफाइल तयार करून गुन्हेगार महिलांना गंडा घालत आहेत. परदेशातून पाठवलेले गिफ्ट हवे असल्यास पैसे भरावे लागतील असेही आमिष दाखवून महिलांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळी बँक खाती देतात आणि या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले जाते. ज्यावेळी पोलिस बँक खात्याची चौकशी करतात त्यावेळी ही खाती प्रमुख आरोपींची नसतात. ही खाती दुसऱ्याच व्यक्तींच्या नावाने असतात. त्यांना सायबर गुन्हेगारी काही प्रमाणात पैसे देऊन बँक खात्यांचा वापर करत असल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे.
बँका कधीही ग्राहकांना फोन करत नाहीत. त्यामुळे खात्यासंदर्भात किंवा डेबिट, क्रेडिट कार्डची फोन करून कोणी माहिती मागत असल्यास देऊ नका. किंवा अशा फोनवर विश्वास ठेऊ नका. ओटीपी नंबरही कोणालाही शेअर करू नका – राकेश मानगावकर पोलिस निरीक्षक कोपरगाव शहर पोलिस ठाणे
अशीच गंभीर घटना कोपरगावात उघड झाली असून त्यात द्वारकानगरी या उपनगरातील तरुण आशिष गवळी हा आपले शिक्षण घेता घेता व्यवसाय करण्यासाठी एका डीलरशिपच्या शोधात होता.त्याला ऑनलाइन एम.आर.एफ.या टायर क्षेत्रातील नामांकित कंपनीची जाहिरात दिसल्याने तो हरकून गेला व त्याने त्या जाहिरातीत दिलेल्या तरुणांच्या संपर्कात आला.त्याने ती वेबसाईट उघडून त्यावरील भ्रमणध्वनिवरील संपर्क करून समोरील व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने आपण एम.आर.एफ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.”तुम्हाला या कंपनीची डीलर शिप हवी असल्यास, आपणाला मी सांगेन त्या कंपनीच्या बँक खात्यावर पैसे जमा करावे लागतील”.त्याप्रमाणे फिर्यादी तरुणाने वेळोवेळी वरील बँक खात्यात १९ लाख ७५ हजार ८०० रूपये जमा केले.पैसे जमा केल्यावर त्याच्या वर्तनात लगेच फरक पडला त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांचे लक्षात आले असून त्याने या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र..नं.६५/२०२० भा.द.वि.कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ ( डी ) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मांगावकार व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली असून हा गुन्हा नगर येथील सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसानी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.
Leave a Reply