संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी, रस्त्यांचे सुशोभिकरण, भूमिगत गटारी आदी विकास कामांसाठी २ कोटी १९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने पाच नंबर साठवण तलावाचे खोदाई काम सुरु झाले आहे. मागील ४० दिवसांपासून या साठवण तलावाचे खोदाई काम अविरतपणे सुरु आहे. ज्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरु आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या सहकार्याने शासनाच्या नियोजन विभाग, नगर विकास विभाग, जिल्हा नियोजन समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांकडून निधी मिळविण्यात यश मिळत आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेने सेवा करण्याची संधी दिली असून नागरिकांच्या विश्वासाला तडा जावू न देता मतदार संघाचा सर्वागीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. विकासकामांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित यश मिळत असून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी नुकताच ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच कोपरगाव शहरासाठी २ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मिळवून शहर व ग्रामीण भागाचा एकाचवेळी विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. कोपरगाव शहरात मागील पाच वर्षात विकासाचा मोठा अनुशेष बाकी आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी मिळालेल्या निधीची मदत होणार आहे. या निधीतून कोपरगाव शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच विविध रस्त्यांना पेव्हिंग ब्लॉक बसविणेसाठी या निधीचा वापर होणार आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यासाठी भूमिगत गटारींचे कामे मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे.
Leave a Reply