संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्याची आसन व्यवस्था श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाने जाहीर केली असून मंगळवार दि. १८ फेब्रुवारी सकाळी संपन्न होणाऱ्या इंग्रजी विषयाची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे असेल. बैठक क्रमांक पी.०५६१९१ ते पी.०५६५१५ पर्यंत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था के.बी.पी. विद्यालय, कोपरगाव येथे करण्यात आलेली आहे. केंद्र क्रमांक २४४ च्या उर्वरीत विद्यार्थ्यांची परीक्षेची बैठक व्यवस्था श्री गंगागिरी महाराज महाविद्यालय, कोपरगाव येथे केलेली आहे.राहिलेल्या सर्व पेपरची बैठक व्यवस्था या महाविद्यालयात करण्यात आलेली आहे. परीक्षा निकोप व कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यास भ्रमणध्वनी तसेच तत्सम इलेक्ट्रोनिक साहित्य परीक्षाकक्षेमध्ये नेण्यास सक्त मनाई केली असल्याचे आवाहन मा. प्राचार्य डॉ. थोपटे एस.आर. व केंद्र संचालक उपप्राचार्य प्रा. सोनवणे डी.डी. यांनी आमच्या प्रतिनिधीस प्रसिद्धीस आहे.
Leave a Reply